शासनाच्या माध्यमातून देशात घरकुल योजना राबवली जाते, त्यामुळे विविध लाभार्थ्यांना घरकुल योजनेच्या माध्यमातून घर बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जातो, त्याचप्रमाणे या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत मोठ्या संख्येने नागरिकांनी लाभ घेतलेला आहे, त्याच पद्धतीने जे नागरिक लाभ घेण्यापासून वंचित आहे, अशांना सुद्धा लाभ देणे चालूच आहे त्यामुळे तुम्ही जर घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज केलेला असेल तर तुम्ही सुद्धा घरकुलाची यादी बघू शकता कारण शासनाच्या माध्यमातून 30 मे रोजी यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, यामध्ये नवीन घरकुलाच्या लाभार्थ्यांची नावे असणार आहे.
महाराष्ट्र राज्यासाठी नव्याने 33 लाखापेक्षा अधिक घरकुलाची उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे, त्यामुळे सर्वप्रथम यादी डाऊनलोड करण्यासाठी https://pmayg.nic.in/netiayHome/home.aspx ओपन करून घ्या आवास सॉफ्ट वर जाऊन रिपोर्टवर ओपन करा, आय बटन च्या अंतर्गत असलेले तीन नंबरचे ऑप्शन निवडून त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता देशभरातील प्रवर्गनिहाय संख्या दाखवली जाईल. यामध्ये नंतर तुम्हाला राज्य निवडण्याची ऑप्शन दाखवले जाईल त्यामुळे महाराष्ट्र राज्य निवडा व तुम्ही कोणत्या जिल्ह्यातील रहिवासी आहात तो जिल्हा निवडून तालुका निवडून तुम्ही कोणत्या गावाचे रहिवाशी आहात ते गाव सुद्धा निवडून घ्या.
घरकुल यादी लिंक: https://rhreporting.nic.in/netiay/AwaasPlus2018Reports/AwaasPlusCategoryWiseVerReport.aspx
वरील माहिती निवडल्यानंतर सबमिट ऑप्शन निवडा, अशाप्रकारे तुमच्या समोर तुम्ही जो गाव निवडलेले असेल त्या गावाची संपूर्ण यादी दाखवली जाईल, त्यामध्ये एप्लीकेशन नंबर सह लाभार्थ्याचे नाव तसेच प्रवर्गानुसार असलेली प्रायोरिटी सुद्धा दाखवली जाईल. अशाप्रकारे अत्यंत सहजपणे तुम्ही घरकुलाची यादी तुमच्या गावाची किंवा ज्या कोणत्या गावाची डाउनलोड करायची असेल ती करू शकता.
रेशन कार्ड ला आधार कार्ड लिंक आहे की नाही? लगेच मोबाईल वरून अशा पद्धतीने चेक करा