हवामान विभागाच्या माध्यमातून मान्सून बद्दल हवामान अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे, मान्सूनसाठीची पोषक स्थिती निर्माण झालेली असल्याने, येथे 48 तासामध्ये मान्सून हा विदर्भामध्ये दाखल होणार असल्याची माहिती देण्यात आलेली असून, देशातील इतरही भागात मान्सून दाखल होणार. राज्यातील काही भागात मान्सून प्रगती करेल त्याचप्रमाणे इतर राज्यातही प्रगती करणार असल्याची माहिती दिली त्यामध्ये छत्तीसगड व ओडिसातील काही भागात सुद्धा मान्सून प्रवेश करत असेल.
राज्यातील काही भागांमध्ये पुढील पाच दिवस मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे, त्यामध्ये विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र व कोकण यांचा सामावेश असेल. त्याचप्रमाणे विदर्भातील अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर या ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे, तसेच कोकणातील सिंधुदुर्ग, सांगली, रत्नागिरी, कोल्हापूर या ठिकाणी सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये सुद्धा येल्लो अलर्ट देण्यात आलेला आहे, अशाप्रकारे हवामान अंदाज व्यक्त करण्यात आलेला असून, महाराष्ट्रामध्ये विदर्भात येत्या 48 तासांमध्ये मान्सून दाखल होणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे, त्याच पद्धतीने मान्सून ला पोषक हवामान असल्याने देशातील इतर भागात सुद्धा मान्सून प्रवेश करणार आहे,
लाडकी बहीण योजना जून महिन्याचा हप्ता कधी मिळणार? लाडक्या बहिणींना लवकरच पुढील हप्ता