मोटरसायकलवर हेल्मेट न वापरणे, सिग्नल तोडणे तसेच इतर बाबींसाठी भरावा लागणार मोठा दंड, शासनाचे नवीन नियम | Vehicle Rules 

तुम्ही जर दुचाकी किंवा चार चाकी अशा प्रकारची वाहने चालवत असाल तर सावध व्हा, शासनाच्या माध्यमातून मोठी माहिती देण्यात आलेली आहे, त्यानुसार पूर्वी जो हेल्मेट न वापरल्यास तसेच सिग्नल तोडल्यास दंड आकारला जात होता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आलेली आहे, त्याचप्रमाणे काही कारणाने तुम्हाला जेलमध्ये सुद्धा पाठवले जाऊ शकते, त्यामुळे तुम्ही जर वरील प्रमाणे दुचाकी किंवा चारचाकी वाहन चालक असाल तर खालील प्रमाणे देण्यात आलेली माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरू शकते.

 

  • दुचाकी वाहनासाठीचा नियम या नियमानुसार तुम्ही जर दुचाकी वाहन चालवत असताना हेल्मेट वापरत नसाल, तर तुमच्यावर 1000 रुपयाचा दंडा आकारला जाऊ शकतो, त्याच पद्धतीने 3 महिन्यासाठी लायसन्स रद्द केले जाईल. जास्त प्रवाशासह प्रवास करत असल्यास 1 हजार रुपयांचा दंड आकारला जाईल.

 

  • 4 चाकी वाहन नवीन नियमानुसार तुम्ही जर गाडी चालवताना सीट बेल्ट वापरत नसाल तर त्यासाठी 1 हजार रुपयांचा दंड आकारला जाईल, त्याचप्रमाणे वाहन चालवताना फोनचा वापर करत असल्यास 5000 रुपयांचा दंड आकारला जाईल.

 

  • अल्पवयीन बालक वाहन चालवत असल्यास त्यांच्या पालकांवर 25 हजारांचा दंड त्याचप्रमाणे वाहन नोंदणी 1 वर्षासाठी बंद केली जाईल, तसेच 3 वर्षाचा तुरुंगवास होईल.

 

  • दारू पिऊन वाहन चालवत असल्यास 6 महिन्याचा तुरुंगवास त्याच पद्धतीने 10 हजार रुपये एवढा दंड, हे पहिल्यांदा पकडल्यास, पुन्हा दुसऱ्यांदा पकडल्यास 2 वर्षासाठी तुरुंगवास व 15 हजार रुपये दंड असेल.

 

  • सिग्नल तोडल्यास व जोराने गाडी चालवल्यास पाच हजार रुपये एवढा दंड आकारला जाईल.

 

अशाप्रकारे शासनाच्या माध्यमातून विविध प्रकारच्या बाबीसाठी वरील प्रमाणे दंड तसेच काही बाबींसाठी तुरुंगवासाची शिक्षा या संबंधित संपूर्ण माहिती जाहीर केलेली आहे, त्यामुळे अर्थातच दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या अपघाताचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे.

घरबसल्या रेशन कार्ड ची केवायसी करा, केवायसी प्रक्रिया संपूर्ण प्रोसेस 

Leave a Comment

WhatsApp Icon