इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी मिळणार शासनाच्या माध्यमातून मोठे अनुदान, महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण | Subsidy For Purchase Of Electric Vehicle

महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण 2025 आणण्यात आलेले आहे, इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठीचे अनुदान देण्यात येणार आहे त्यामुळे यामध्ये दुचाकी तसेच इतर प्रकारच्या वाहनांचा सुद्धा समावेश आहे, त्यामुळे या इलेक्ट्रिक वाहन अनुदानासंबंधी संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात, यामध्ये इलेक्ट्रिक दुचाकी पासून चार चाकी ट्रॅक्टर पर्यंतचे हे अनुदान असणार आहे.

 

कोणत्या वाहनाला किती अनुदान?

 

इलेक्ट्रिक दुचाकी वाहनासाठी 1 लाख दुचाकिंना 10000 रुपये, 3 चाकी वाहनासाठी म्हणजेच 15 हजार रिक्षासाठी 30000 रू पर्यंतची अनुदान मिळेल, इलेक्ट्रिक तीन चाकी मालवाहू 15000 वाहनांना 30000 रुपये अनुदान, इलेक्ट्रिक चारचाकी दहा हजार वाहनांना दीड लाखाची अनुदान, परिवहन विभागाच्या चारचाकी वाहनांना 2 लाखापर्यंतचे अनुदान, इलेक्ट्रिक बसेस साठी 20 लाख रुपये पर्यंतचे अनुदान, इलेक्ट्रिक चार चाकी मालवाहू वाहन 2 लाख रुपये अनुदान, शेतीसाठीचे ट्रॅक्टर इलेक्ट्रिक यंत्र यासाठी 1 लाख 50 हजार पर्यंतचे अनुदान दिले जाईल.

 

अशा पद्धतीने इलेक्ट्रिक वाहन अनुदाना संबंधित जीआर शासनाच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे, त्यामुळे तुम्ही जर इलेक्ट्रिक वाहन घेण्याच्या तयारीत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरू शकते, कारण तुम्हाला सुद्धा इलेक्ट्रिक वाहनासाठी अनुदान मिळू शकते, त्यामुळे अशी संपूर्ण माहिती इलेक्ट्रिक वाहन अनुदानासंबंधीत वरील प्रमाणे देण्यात आलेली आहे.

 

पी एम किसान योजना हप्ता अपडेट, या तारखेनंतर पडणार शेतकऱ्यांच्या खात्यावर 2000 रुपये

Leave a Comment