पाईपलाईन अनुदान योजना 2025, अर्ज सुरू, अर्जाची संपूर्ण प्रोसेस | Pipeline Anudan Scheme 2025

पाईपलाईन अनुदान योजनेचे अर्ज चालू झालेले आहे त्यामुळे तुम्ही जर शेतकरी असाल व तुम्हाला सुद्धा अनुदानावर पाईपलाईन मिळवायची असेल तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची ठरू शकते, महाडीबीटी फार्मर स्कीमच्या माध्यमातून पाईपलाईन योजनेसाठी चा अर्ज करता येणार आहे, त्यामुळे योजनेसाठी मिळणारे अनुदान त्याच पद्धतीने अर्ज कशा पद्धतीने करायचा याची संपूर्ण प्रोसेस खालील प्रमाणे जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात.

 

पाईपलाईन अनुदान किती?

 

यामध्ये प्रवर्गानुसार हे अनुदान मिळेल यामध्ये ओपन, ओबीसी या प्रवर्गातील लाभार्थ्याला 35 रुपये प्रति मीटर प्रमाणे अनुदान दिले जाईल, व हे अनुदान पीव्हीसी पाईप साठी असणार आहे, त्याच पद्धतीने एचडीपी पाईप साठी पन्नास रुपये प्रति मीटर प्रमाणे अनुदान दिले जाईल, 428 मीटर पाईपर्यंतचे जास्तीत जास्त पंधरा हजार रुपयांच्या मर्यादेमध्ये अनुदान दिले जाणार आहे. एससी, एसटी कॅटेगिरीच्या लाभार्थ्याला 100% अशा अनुदान या योजनेच्या माध्यमातून दिले जाईल व हे अनुदान जास्तीत जास्त 30000 रुपये पर्यंतचे असेल.

 

पाईपलाईन अनुदान योजना अर्ज प्रक्रिया प्रोसेस

 

अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम महाडीबीटी फार्मर पोर्टल ओपन करावे फार्मर आयडी टाकून लॉगीन करा फार्मर आयडी माहिती नसल्यास त्या ठिकाणी ऑप्शन देण्यात आलेले आहे, त्या ठिकाणी आधार नंबर टाकून फार्मर आयडी सुद्धा माहीत करून घेता येतो, लॉगिन केल्यानंतर, प्रोफाइल 100% भरा, नवीन घटकासाठी अर्ज करा मध्ये जाऊन, सिंचन साधने व सुविधा हे ऑप्शन निवडा. विविध बाबी दाखवण्यात येईल, त्यामध्ये पाईप निवडा, वेगवेगळे पाईप दाखवण्यात येईल त्यामध्ये तुम्ही जो हवा तो निवडा पीव्हीसी पाईपचे सुद्धा ऑप्शन त्या ठिकाणी असेल.

 

तुम्ही 60 मीटर पासून 428 मीटर पर्यंतचा अर्ज करू शकता त्यामध्ये शक्यतो 428 मीटर निवडावे, त्यानंतर जतन करा वर जा, त्या ठिकाणी तुम्हाला अर्ज सादर करायचे ऑप्शन दिसेल त्यावर जाऊन त्या ठिकाणी तुम्ही भरलेली संपूर्ण माहिती पुन्हा एकदा चेक करा व अर्ज सबमिट करा. त्यानंतर तुम्हाला 23 रुपये 60 पैशाची पेमेंट करावे लागेल. अशा पद्धतीने तुमचा महाडीबीटी फार्मर स्कीमच्या माध्यमातून पाईपलाईन अनुदानाचा अर्ज पूर्ण होईल.

Maha dbt portel link:- https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/AgriLogin/AgriLogin

 

Leave a Comment