सौरचलीत फवारणी यंत्रासाठी 100 टक्के अनुदान, अर्ज प्रक्रिया चालू, अर्ज करण्याची संपूर्ण प्रोसेस | saurachalit favaarani pump 

खरीप हंगाम चालू झालेला आहे त्यामुळे कापूस सोयाबीन अशा प्रकारच्या विविध पिकांची लागवड शेतकरी मोठ्या प्रमाणात करतात, अशा वेळी पिकांचे संरक्षण होण्यासाठी विविध प्रकारच्या यंत्राचा समावेश शेतकऱ्याला करावा लागतो, त्यातीलच म्हणजेच फवारणी पंप फवारणी पंपाचा उपयोग मोठ्या प्रमाणात केला जातो, व अशाच सौरचलित फवारणी यंत्रासाठी 100 टक्के एवढे अनुदान दिले जाणार आहे, त्यामुळे यासाठीची अर्ज प्रक्रिया चालू झालेली असून, महाडीबीटी फार्मर स्कीमच्या पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया अत्यंत सहज पद्धतीने पूर्ण करता येणार आहे, त्यामुळे खालील दिलेल्या संपूर्ण प्रोसेस नुसार तुम्ही अगदी सहजरीत्या सौरचलित फवारणी पंपासाठीच्या अनुदानासाठी अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकता.

 

सौरचलित फवारणी यंत्र अर्ज प्रोसेस

 

  • अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सर्वप्रथम महाडीबीटी फार्म स्कीमच्या पोर्टलवर यावे, पोर्टल ओपन करून सर्वप्रथम त्या ठिकाणी फार्मर आयडी विचारला जाईल.

 

  • त्यानंतर तुम्ही तुमचा फार्मर आयडी एंटर करा फार्मर आयडी एंटर केल्यानंतर ओटीपी पाठवला जाईल.

 

  •  परंतु तुमच्याकडे फार्मर आयडी नसेल तर फार्मर आयडी काढण्यासाठी सुद्धा ऑप्शन खाली देण्यात आलेले असेल, फार्मर आयडी जाणून घ्या या ऑप्शनवर जाऊन त्या ठिकाणी शेतकऱ्याचा आधार कार्ड क्रमांक टाकून फार्मर आयडी माहिती होईल.

 

  • त्यानंतर लॉगिन करा तुम्हाला तुमचे प्रोफाईल दाखवले जाईल फार्मर आयडीमुळे तुमचे म्हणजेच शेतकऱ्याचे नाव त्या ठिकाणी ओपन होईल, त्याच पद्धतीने शेतकऱ्या संबंधित संपूर्ण माहिती त्या ठिकाणी दिसेल.

 

  • तुम्हाला शंभर टक्के प्रोफाइल भरलेले नसल्यास ते प्रोफाइल भरण्यासाठी प्रोफाइल अशा प्रकारची एक ऑप्शन दिसेल त्यामध्ये जाऊन विचारलेली माहिती भरून जतन करा वर जाऊन शंभर टक्के प्रोफाइल पूर्ण करा.

 

  • त्यानंतर घटकासाठी अर्ज हे ऑप्शन निवडून त्या ठिकाणी कृषी यांत्रिकीकरण हा पर्याय निवडा, मुख्य घटकांमध्ये कृषी यंत्राच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य हा पर्याय निवडावा.

 

  • तपशील मध्ये मनुष्यचलित अवजार हे निवडून उपघटकांमध्ये पिक संरक्षण अवजारे हे निवडावे, त्यानंतर घटकांमध्ये सोलार ऑपरेटर नेपसेक फवारणी पंप हा पर्याय दिसेल हा पर्याय निवडावा.

 

  • त्यानंतर सर्व अटी मान्य आहे त्यानंतर जतन करा वर जाऊन त्या ठिकाणी तुम्हाला तुम्ही भरलेली संपूर्ण माहिती पहा वर जाऊन मिळेल त्यानंतर पेमेंटचे ऑप्शन दिसेल पेमेंटच्या ऑप्शन मध्ये जाऊन 23 रुपये 60 पैशाचे पेमेंट करावे व अर्ज सबमिट करावा.

 

  • अशाप्रकारे अत्यंत सहजरीत्या शेतकऱ्यांना अगदी आपल्या मोबाईलवरून सुद्धा महाडीबीटी फार्मर स्कीमच्या पोर्टलवरून सौरचलित फवारणी यंत्रासाठीचा अर्ज करता येणार आहे.

 

महाडीबीटी पोर्टलवरून अर्ज करण्याची लिंक: https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/AgriLogin/AgriLogin

टोकन यंत्र अनुदानासाठी महाडीबीटी वर अर्ज करण्याची संपूर्ण प्रोसेस, योजनेचा लाभ घ्या 

Leave a Comment