मनरेगा अंतर्गत तुमच्या गावातील कोणते व्यक्ती कोणत्या योजनांचा लाभ घेत आहे? यादी बघण्याची प्रोसेस | Manrega Yojana 

मनरेगाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वैयक्तिक लाभाच्या योजना राबवल्या जात असतात, त्याच पद्धतीने या योजनांचा लाभ गावातील मोठ्या प्रमाणात लाभार्थी घेतात, परंतु अनेक शेतकरी मजूर वर्ग अशांना या योजनांबद्दल कोणतीही माहिती नसल्याने या मनरेगा अंतर्गत असलेल्या योजना पासून मोठ्या प्रमाणात नागरिक वंचित राहू शकतात, त्यामुळे तुम्हाला जर मनरेगाची तुमच्या गावातील लाभार्थ्यांची यादी, तसेच कोणता व्यक्ती कोणत्या योजनेचा लाभ घेतो आहे ही माहिती करून घ्यायचे असेल तर खालील प्रोसेसनुसार यादी पाहता येणार आहे.

 

मनरेगा अंतर्गत लाभार्थी यादी पाहण्याची संपूर्ण प्रोसेस

 

  • लाभार्थी यादी पाहण्यासाठी सर्वप्रथम नरेगाच्या पोर्टलवर जावे लागेल पोर्टल ओपन झाल्यानंतर त्या ठिकाणी विविध प्रकारचे राज्य दाखवली जाईल त्यामध्ये तुम्ही कोणत्या राज्यातील आहे ते निवडून घ्यावे.

 

  • त्यानंतर पंचायत ग्रामपंचायत अशा प्रकारचे ऑप्शन दिसेल त्यामध्ये एंटर करा, त्यामध्ये ग्रामपंचायत अशी ऑप्शन दाखविली जाईल त्यामध्ये तुम्ही जनरेटर रिपोर्ट वर जा.त्यानंतर पुन्हा एकदा राज्य निवडून फायनान्शिअल इयर निवडावे 2024-25 अशा प्रकारे.

 

  • तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये राहता कोणत्या जिल्ह्याची यादी पहायची आहे तो जिल्हा निवडा, त्यानंतर तालुका निवडून तुम्ही कोणत्या गावातील रहिवासी आहात किंवा कोणत्या गावाची यादी बघू इच्छिता त्या ठिकाणी त्या गावाचे नाव निवडा.

 

  • संपूर्ण प्रोफाईल ओपन होईल त्या ठिकाणी तुम्हाला सर्व रिपोर्ट दाखवली जाईल, त्यामध्ये नंबर टू मध्ये वर्क स्टेटस हे ऑप्शन निवडा, त्यामध्ये वर्ष निवडा 2025- 26 वगैरे.

 

  •  त्यामध्ये कोणते काम हवे आहे किंवा तुम्ही All सुद्धा करू शकता व कामाचे नाव सुद्धा देण्यात येईल ग्रामपंचायत ची किंवा वैयक्तिक शेतकऱ्यांची अशी सर्व ऑप्शन दिले जाईल त्यामध्ये तुम्ही जो ऑप्शन हवे असेल वैयक्तिक शेतकरी किंवा इतर ते निवडा.

 

  • अशाप्रकारे तुमच्या समोर तुम्ही संपूर्ण गावातील लाभार्थ्याची यादी बघू शकता त्यामध्ये कुशल, अकुशल त्याच पद्धतीने घरकुल लाभार्थी विहिरीचे लाभार्थी अशा विविध प्रकारच्या लाभार्थ्यांची यादी त्या ठिकाणी तुम्हाला बघता येणार आहे.

 

सौरचलीत फवारणी यंत्रासाठी 100 टक्के अनुदान, अर्ज प्रक्रिया चालू, अर्ज करण्याची संपूर्ण प्रोसेस 

Leave a Comment