मोसमी वाऱ्यांची स्थिती बदललेली आहे, त्यामध्ये चांगल्या प्रमाणात पोषक वातावरण निर्माण झालेले असून, राज्यातील विविध भागांमध्ये मोसमी वारे पोहोचताना दिसतात, त्याच पद्धतीने राज्यातील विविध भागांमध्ये पावसाने सुरुवात केलेली आहे, काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी बरसत आहे, त्यामुळे हवामान अभ्यासकांच्या मते पेरणी बाबतची काही महत्त्वाच्या बाबी त्याच पद्धतीने मान्सून बाबत राज्यातील स्थिती यांची संपूर्ण माहिती दिलेली आहे.
राज्यातील विविध भागांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस पडतो आहे, परंतु हा पाऊस विदर्भ व मराठवाड्यामध्ये तेवढ्या जास्त प्रमाणात नसणार आहे, मराठवाडा मध्ये पावसाचे प्रमाण कमी आढळेल, संपूर्ण राज्य व्यापण्याच्या मार्गावर मान्सून आहे, या आठवड्यामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाची स्थिती नाही, त्यामुळे मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडू शकतो, विदर्भामध्ये हवा त्या प्रमाणात आत्तापर्यंत पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी जमिनीच्या ओलीचा विचार करून पेरणीचा निर्णय घ्यावा पेरणीसाठी कोणत्याही प्रकारची घाई शेतकऱ्यांनी करू नये.
पेरणी करत असताना शेतकऱ्यांनी काही महत्त्वाच्या बाबी लक्षात घ्याव्या. त्यामध्ये तुमच्या जमिनीमध्ये एक फूट ओल गेलेली असेल तरच निर्णय त्यांनी संबंधित घेणे योग्य ठरेल परंतु तुमची जमीन कोरडवाहू असेल पाण्याची सुविधा नसेल व तुमच्या भागामध्ये पाऊस झालेला नसेल तर पेरणीची घाई शेतकऱ्यांनी करू नये पेरणी करण्यापूर्वी इतरत्र प्रकारचा हवामानाचा अंदाज सुद्धा शेतकऱ्यांनी जाणून घ्यावा. राज्यातील 134 तालुक्यांचा विचार करायचा झाल्यास सरासरी 65 मिलिमीटर च्या अधिक पाऊस पडलेला आहे.
टीप: वरील पावसाचा अंदाज हवामान शास्त्रज्ञांनी दिलेल्या स्रोतांवर आधारित असून त्यात बदल होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी लागवड करताना स्थानिक हवामान अंदाज व तज्ज्ञांचा सल्ला विचारात घ्यावा. तसेच शासनामार्फत अधिकृत हवामान अंदाज विचारात घ्यावा.