पीएम सूर्यघर योजनेच्या माध्यमातून मॉडेल सोलर व्हिलेज योजना राबवली जात आहे, या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात शासनाच्या माध्यमातून उद्दिष्टे पुढे ठेवून योजना चालू केली जात आहे, यामध्ये 9 ऑगस्ट 2024 रोजी ही योजना शासनाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेली आहे, शासकीय इमारतींचे सौर विद्युतीकरण, सौर कृषी पंप, बचत गट/सहकारी संस्था/उद्योगांसाठी सौर प्रकल्प, एनआरएलएम गटांसाठी सौर उपकरण, अपारंपरिक ऊर्जा आधारित तंत्रज्ञान, सौर कुकर, सौर लाईट, सौर वॉटर हीटर इत्यादी विविध प्रकल्प या योजनेच्या माध्यमातून राबवली जाईल.
या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये सौर ऊर्जेचा वापर वाढवणे, ग्रामीण भागांना सौर ऊर्जेत स्वयंपूर्ण करणे अशा प्रकारचे उद्दिष्टे ठेवण्यात आलेले आहे, महाराष्ट्रातील 24 गावांमध्ये ही योजना राबवली जाणार आहे. या योजनेमुळे ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात एक प्रकारे सौर ऊर्जेचा वापर वाढेल व त्यामुळे वीजेची मोठ्या प्रमाणात बचत होऊ शकणार आहे.
शेती व्यवसाय उद्योगासाठीचा वीज पुरवठा त्याचप्रमाणे महिला बचत बचत गटासाठी सौर प्रकल्प, गावाचा आर्थिक विकास साधने तसेच रोजगार निर्मिती करणे, स्वच्छ व प्रदूषण मुक्त ऊर्जा तसेच विजेची बचत करणे अशा प्रकारची उद्दिष्टे या योजनेच्या माध्यमातून पुढे ठेवून मोठ्या प्रमाणात या योजनेमुळे लाभ सर्वसामान्यांना मिळणार आहे.
या योजनेसाठी गावाची निवड प्रक्रिया चालू आहे त्यामध्ये पाच हजारापेक्षा जास्त लोकसंख्या असलेली गावे निवडली जातील, महसूल गाव असावे, निवड झालेल्या गावाला मोठ्या प्रमाणात सौर ऊर्जेवर चालणारी विविध प्रकारची सौर उपकरणे वापरावी लागेलं, पी एम सूर्य वर अंतर्गत घरावर सोलार लावने, यामध्ये 90% एवढे अर्थसहाय्य दिले जाईल सौर कृषी पंप सौर आधारित इतर यंत्रे अशांचा यात समावेश असणार आहे.