फळ पिक विमा भरण्यासाठी वाढीव तारीख जाहीर, या तारखेपर्यंत शेतकऱ्यांना भरता येणार फळ पिक विमा | Fal Pik Vima Yojana 

देशामध्ये दरवर्षी फळ पिक विमा योजना राबवली जाते, या योजनेच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये फळ पिकाची लागवड केलेली आहे, त्यांना पीक संरक्षण दिले जाते, त्यामूळे शेतकऱ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात फळ पीक विमा काढला जातो, हाच पिक विमा यावर्षी सुद्धा अनेक शेतकऱ्यांनी काढलेला आहे परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे किंवा शेतकऱ्यांना याबद्दल माहिती नसल्यामुळे बहुतांशी शेतकऱ्यांनी पिक विम्यामध्ये सहभाग नोंदवलेल्या नाही त्यामुळे आता एक प्रकारची वाढीव मुदत देण्यात आले गीली आहे.

 

फळ पिक विमा भरण्याची तारीख 14-06-25 देण्यात आलेली होती, परंतु तरीही अनेक शेतकरी पिक विमा योजने सहभागी झालेले नसल्याने अशा शेतकऱ्यांसाठी आता पुन्हा एकदा 17 जून पासून ते 30 जून पर्यंतची वाढीव मुदत शेतकऱ्यांना पिक विमा योजनेत सहभाग नोंदवण्यासाठीची देण्यात आलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून मृग बहार 2025 मध्ये द्राक्ष, लिंबू, संत्रा, पेरू या पिकासाठी चा पिक विमा काढता येणार आहे.

 

पिक विमा कंपनीच्या माध्यमातून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीक विमा काढावा याबद्दलची प्रचारा मोहीम सुद्धा राबवावी, त्यामुळे मोहीम च्या माध्यमातून करण्यात आव्हानुसार जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी फळ पिक विमा काढावा असे सुद्धा सांगितले जावे, पिक विमा योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पिकाचे संरक्षण दिले जाते, कोणतीही प्रकारची नैसर्गिक आपत्ती दुष्काळ आहे अतिवृष्टी अशा विविध प्रकारचे नुकसान याला संरक्षण म्हणून शेतकऱ्यांनी पीक विमा काढावा. जे शेतकरी फळ पिक विमा काढू इच्छितात, अशांनी 30 जुन पर्यंत पिक विमा काढून घेणे आवश्यक असेल कारण 30 जून नंतर पिक विमा भरता येणार नाही.

Leave a Comment

WhatsApp Icon