शेतकऱ्यांना विविध ठिकाणी सातबारा उतारा व आठ अ काढताना अडचणी येतात, त्यामुळे इतर ठिकाणी किंवा आपले सरकार सेवा केंद्रामध्ये जाऊन त्यांना सातबारा काढावा लागतो, परंतु यामध्ये मोठ्या प्रमाणात वेळ व पैसा खर्च केला जातो, त्याच पद्धतीने सुरक्षिततेमध्ये सुद्धा शंकाच असते,त्यामुळे अशा सर्व बाबींना थांबवण्यासाठी व गैरप्रकार थांबवण्यासाठी शासनाच्या माध्यमातून म्हणजेच महाराष्ट्र भूमी अभिलेख विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसंबंधीत मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे, या निर्णयानुसार शेतकऱ्यांना आता व्हाट्सअप वर सातबारा व आठ अ सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
यामध्ये सातबारा, आठ अ, फेरफार नोंदणी सह विविध प्रकारच्या सुविधा whatsapp वर अगदी पंधरा रुपयांमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे, व्हाट्सअप वर 1 ऑगस्ट पासून ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे, यामध्ये पारदर्शकता निर्माण होऊन शेतकऱ्यांना इतरत्र ठिकाणी न जाता, सहज आपल्या मोबाईलच्या माध्यमातून शेतीचा सातबारा व इतर कागदपत्रे कढण्याची सुविधा उपलब्ध होईल.
सुविधेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना भूमी अभिलेख विभागाच्या संकेतस्थळावर मोबाईल क्रमांक नोंदवावा लागेल. सर्वप्रथम शेतकऱ्यांना सर्व माहिती भरून एकदाच 50 रुपये एवढे शुल्क भरावी लागणार आहे, व मोबाईल क्रमांक ओटीपी च्या माध्यमातून पडताळल्यानंतर शेतकऱ्यांना अगदी सहजरीत्या मोबाईलवर संपूर्ण प्रकारची कागदपत्रे मिळतील.ही सुविधा 1 ऑगस्ट पासून संपूर्ण राज्यामध्ये चालू होणार आहे.
फळ पिक विमा भरण्यासाठी वाढीव तारीख जाहीर, या तारखेपर्यंत शेतकऱ्यांना भरता येणार फळ पिक विमा