महाडीबीटी मध्ये असलेल्या सर्व योजनांची यादी, मोबाईल वरून करा सर्व योजनांसाठीचे अर्ज | MahaDBT Yojana 

राज्यामध्ये महाडीबीटी स्कीमच्या माध्यमातून विविध प्रकारच्या योजना राबवल्या जातात, महाडीबीटीवर विविध योजनांचा समावेश असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया करून शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या योजनांचा लाभ घेता येतो, परंतु या महाडीबीटीवर अर्ज कसा करायचा त्याच पद्धतीने कोणत्या योजना महाडीबीटी मध्ये आहे, त्याची संपूर्ण माहिती अनेक शेतकऱ्यांना नाही, त्यामुळे या महाडीबीटी वरील विविध योजनांची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न थोडक्यात करूयात.

 

महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाच्या माध्यमातून शेततळ्याचं अस्तरीकरण, प्लॅस्टिक मल्चिंग, कांदाचाळ, आळंबी उत्पादन, नर्सरी स्थापनेसाठी आर्थिक मदत, शीतगृह, पॅक हाऊस, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अंतर्गत ठिबक व तुषार सिंचन योजनेचा लाभ सुद्धा महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून दिला जातो, राष्ट्रीय कृषी विकास योजना तसेच राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण कृषी यांत्रिकीकरण उप अभियान यांच्या माध्यमातून ट्रॅक्टर, रोटावेटर, ट्रेलर, प्रेयर, नांगर, पेरणी यंत्र, मळणी यंत्रे, प्लँटर, रिजर यांचा समावेश होतो.

 

राष्ट्रीय अन्ना व सुरक्षा अभियानाच्या माध्यमातून कडधान्य, गळीत धान्य, भरडधान्य, तृणधान्य, कापूस, भात, ऊस त्याच पद्धतीने बियाणे, पिक संरक्षण, औषधे, डिझेल इंजिन, पेरणी मळणी यंत्र, पीव्हीसी पाईप, इलेक्ट्रिक मोटर यांचा लाभ दिला जातो, अशा प्रकारच्या विविध योजनांचा लाभ महाडीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिला जातो, विविध वेळेला विविध प्रकारच्या योजनांची तारीख ठरवून लाभ दिला जातो.

 

महाडीबीटी च्या माध्यमातून अर्ज प्रक्रिया कशी करावी?

 

महाडीबीटी पोर्टल वर अर्ज प्रक्रिया करण्यासाठी सर्वप्रथम पोर्टल ओपन करावे,  ओपन केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला फार्मर आयडी टाकून लॉगीन करायचे आहे, फार्मर आयडी टाकल्यानंतर तुमची 100% प्रोफाइल भरावी लागेल, तर माहिती भरून जतन करा हे ऑप्शन निवडून, प्रोफाइल शंभर टक्के भरा, त्यानंतर घटकासाठी अर्ज करा हे ऑप्शन निवडून, त्या ठिकाणी विविध प्रकारचे ऑप्शन दाखवले जाईल, वरील प्रमाणे आपण दिलेली संपूर्ण योजना ओपन होतील त्यातील तुम्हाला ज्या योजनेचा अर्ज करायचा आहे ती योजना निवडावी.

 

निवडल्यानंतर त्या योजने संबंधित म्हणजेच तुम्ही कोणत्या घटकाचा लाभ घेत आहात त्या संबंधित विचारलेली माहिती जमिनीची तसेच शेतकरी कशाची मागणी करतो आहे? अशी माहिती भरून जतन करा वर जाऊन त्या ठिकाणी अर्ज सादर करा, हे ऑप्शन दिसेल अर्ज सादर करा वर गेल्यानंतर पेमेंट करा हे ऑप्शन येणार, पेमेंट करा मध्ये जाऊन 23 रुपये 60 पैसे असे ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करावे लागेल, व अशा पद्धतीने विविध प्रकारच्या योजनाचा अर्ज शेतकरी अगदी सहजरीत्या करू शकतो.

Leave a Comment