FARMER ID शोधा फक्त 2 मिनिटात, मोबाइल द्वारे, संपुर्ण योजनांचा लाभ मिळवण्यास farmer ID आवश्यक | FARMER ID

Aapla shetkari

FARMER ID शोधा फक्त 2 मिनिटात, मोबाइल द्वारे, संपुर्ण योजनांचा लाभ मिळवण्यास farmer ID आवश्यक | FARMER ID

Farmer ID, FARMER ID शोधा फक्त 2 मिनिटात, Mahadbt योजना, फार्मर आयडी चेक करण्याची प्रोसेस, संपुर्ण योजनांचा लाभ मिळवण्यास farmer ID आवश्यक

राज्यामध्ये शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या योजना राबवल्या जातात, योजनांचा लाभ घेत असताना आता शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी असणे बंधनकारक करण्यात आलेले आहे, त्यामुळे तुम्हाला जर महाडीबीटी किंवा इतर प्रकारच्या योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर सर्वप्रथम त्या ठिकाणी फार्मर आयडी एंटर करावा लागतो, व त्यानंतरच संपूर्ण प्रोफाईल ओपन होऊन शेतकऱ्यांना अर्ज प्रक्रिया पूर्ण करता येते, त्यामुळे शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी असणे अत्यंत बंधनकारक करण्यात आलेले आहे. फार्मर आयडी काढल्यानंतर शेतकऱ्याला तो कसा शोधावा हे प्रोसेस माहिती नसल्याने शेतकरी चिंतेत झालेले आहे, त्यामुळे महाडीबीटी पोर्टल वर जाऊन अत्यंत सोपी प्रोसेस करून शेतकऱ्याला आपला फार्मर आयडी चेक करता येणार आहे.

 

फार्मर आयडी चेक करण्याची प्रोसेस

 

फार्मर आयडी चेक करण्यासाठी सर्वप्रथम महाडीबीटी पोर्टल ओपन करावे त्याठिकाणी शेतकऱ्याला दोन ऑप्शन दाखवले जाईल, त्यामधील वैयक्तिक शेतकरी हे ऑप्शन निवडा त्यानंतर शेतकऱ्याला खालील रखान्यांमध्ये फार्मर आयडी एंटर करा हे ऑप्शन दाखवले जाईल त्या ऑप्शनच्या माध्यमातून शेतकऱ्याला महाडीबीटी वर असलेल्या योजनांचा फार्मर आयडी एंटर केल्यानंतर अर्ज करता येतो, त्या ठिकाणी शेतकऱ्याला फार्मर आयडी जाणून घ्या हे ऑप्शन दिसेल त्यावर जाऊन शेतकऱ्यांनी आपला स्वतःचा आधार नंबर एंटर करावा त्यानंतर गेट ओटीपी वर जाऊन आलेला ओटीपी त्या रखण्यामध्ये भरून ओटीपी तपासा हे निवडून त्या ठिकाणी तुमचा फार्मर आयडी दाखवला जाईल तोच तुमचा फार्मर आयडी असणार आहे.

 

सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे जर शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढलेलाच नसेल तर जवळच्या सीएससी सेंटरमध्ये जाऊन त्या ठिकाणी आधार कार्ड व सातबारा सह शेतकऱ्याला फार्मर आयडी काढून घेता येणार आहे, व वरील दिलेल्या प्रोसेस नुसार फार्मर आयडी महाडीबीटी पोर्टलवर जाऊन चेक सुद्धा करता येणार आहे.अशा प्रकारची फार्मर आणि चेक करण्याची संपूर्ण प्रोसेस अत्यंत सहज व सोपी व शेतकऱ्यांना समजेल अशी आहे त्यामुळे तुम्ही जर शेतकरी असाल तर तुमचा फार्मर आयडी माहिती नसेल तर तुम्ही चेक करू शकता.

Maha dbt: https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/AgriLogin/AgriLogin

मॉडेल सोलर व्हिलेज योजना, योजनेची उद्दिष्टे, पात्रता व संपुर्ण माहिती

Leave a Comment

WhatsApp Icon