एक जुलै 2025 पासून खरीप हंगामाचा पिक विमा भरणे चालू होणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना कोणत्या पिकासाठी किती रुपये पिक विमा भरावा लागेल, हे जाणून घेणे गरजेचे आहे कारण प्रत्येक जिल्ह्यामध्ये विविध प्रकारच्या पिकानुसार कमी जास्त प्रमाणात टक्केवारीनुसार पीक विम्याची रक्कम शेतकऱ्याला भरावी लागणार आहे, त्यामुळे शेतकऱ्याला कोणत्या पिकासाठी किती रुपये रक्कम भरावी लागणार, त्याच पद्धतीने सर्वात शेवटी शासनाच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आलेला जीआर त्यामध्ये तुम्ही कोणत्या जिल्ह्यातील आहात त्यानुसार जिल्ह्यामधील पिक विमा भरण्याची टक्केवारी व भरण्याची रक्कम सुद्धा जाणून घेऊ शकता.
शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2025 साठी विमा संरक्षित हप्त्याच्या जास्तीत जास्त दोन टक्के पर्यंत रककम काम भरावी लागणार आहे ही रक्कम प्रत्येक जिल्ह्यानुसार वेगवेगळी असणार आहे, व भरण्याच्या रकमेची टक्केवारी सुद्धा विविध पिकानुसार वेगवेगळी असेल, अन्नधान्य गळीत धान्य पिके यासाठी जास्तीत जास्त 2 टक्के पर्यंतची रक्कम शेतकऱ्यांना भरावी लागेल, तर नगदी पिके यात कांदा व कापूस अशा पिकांसाठी जास्तीत जास्त 5 टक्के पर्यंत ची रक्कम शेतकऱ्याला भरावी लागणार आहे.
ज्वारीसाठी जास्तीत जास्त दोन टक्के प्रमाणे 660 रुपये प्रति हेक्टर प्रमाणे विमा हप्ता भरावा लागणार आहे, हा काही जिल्ह्यांमध्ये कमी जास्त प्रमाणात आहे. दोन टक्केच्या प्रमाणामध्ये बाजरीसाठी सहाशे रुपये एवढा विमा हप्ता भरावा लागेल, काही जिल्ह्यांमध्ये 1.50 किंवा 1.75 किंवा 1 टक्के अशा प्रमाणात सुद्धा हे प्रमाण असू शकते. सोयाबीन साठी दोन टक्केच्या प्रमाणामध्ये 1160 रुपये, मुगा साठी 500 रुपये प्रति हेक्टर दोन टक्केच्या प्रमाणात. तुरीसाठी 900 रुपये प्रति हेक्टर 2% च्या प्रमाणामध्ये भरावी लागेल. कापसासाठी तीन टक्के च्या प्रमाणामध्ये 1800 रुपये प्रति हेक्टर एवढा हप्ता असेल.
अशाप्रकारे विविध प्रकारच्या पिकासाठी वरील प्रमाणे पिक विमा हप्ता शेतकऱ्यांना भरावा लागणार आहे, तुमच्या जिल्ह्यामध्ये कोणत्या पिकासाठी किती % हप्ता व किती रुपये भरावे लागतील हे बघण्यासाठी खाली जीआर देण्यात आलेला आहे, त्यामध्ये जाऊन तुम्ही प्रत्यक्ष आपल्या जिल्ह्यातील भरावयाची रक्कम चेक करू शकता.