पोकरा योजनेअंतर्गत टप्पा 2.0 टप्पा राबवण्यास मंजूर देण्यात आलेली आहे, त्यामुळे तुमचे गाव पोकरा योजनेमध्ये समाविष्ट आहे की नाही, तुम्ही कोणत्या जिल्ह्यातील आहात? तुमच्या जिल्ह्यातील किती गावे पोखरा योजनेअंतर्गत समावेशित केली गेलेली आहे, याची संपूर्ण माहिती शेतकऱ्याला असणे आवश्यक आहे, कारण पोकरा योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात योजनांचा लाभ शेतकऱ्याला दिला जातो, त्यामुळे तुमचे गाव जर पोकरा योजनेमध्ये समाविष्ट असेल तर विविध योजनांचा लाभ तुम्ही शेतकरी असल्यास तुम्हाला घेता येतो.
पोकरा योजनेमध्ये एकूण 7386 गावांचा समावेश करण्यात आलेला आहे, व यामध्ये एकूण गावे ही 21 जिल्ह्यांमधील समाविष्ट आहे, त्यामुळे तुम्ही कोणत्या जिल्ह्यातील आहात व तुमच्या ग्रामपंचायतीचे नाव पोखरा योजनेमध्ये समाविष्ट आहे की नाही? तुम्हाला जिल्ह्यानुसार व ग्रामपंचायत नुसार सर्व प्रकारची यादी खालील प्रोसेस नुसार चेक करता येईल.
पोकरा योजना अंतर्गत असलेल्या गावांची यादी चेक करण्याची प्रोसेस
नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेसाठीचे एक डॅशबोर्ड तयार करण्यात आलेले आहे, डॅशबोर्ड ओपन करून त्या ठिकाणी सर्वप्रथम मायक्रो लेवल प्लॅनिंग यामध्ये विव्ह रिपोर्ट हे ऑप्शन दिसेल त्यामध्ये जाऊन त्या ठिकाणी तुम्हाला जिल्हा निवडायचा आहे, त्यानंतर सब डिव्हिजन निवडून तालुका निवडा, त्यानंतर फिल्टरवर जाऊन योजने अंतर्गत असलेली 7386 गावांची यादी चेक करू शकता. व त्याचबरोबर संपूर्ण योजने संबंधित माहिती, अनुदानाची संपूर्ण माहिती शेतकऱ्याला जाणून घेता येईल, अशा प्रकारे पोकरा योजने संबंधित यादी वरील प्रमाणे चेक करता येणार आहे.
Pocra गावांची यादी पाहण्यासाठी लिंक:- https://mahapocra.gov.in/vp
FARMER ID शोधा फक्त 2 मिनिटात, मोबाइल द्वारे, संपुर्ण योजनांचा लाभ मिळवण्यास farmer ID आवश्यक