राज्यामध्ये बांधकाम कामगार योजनांच्या माध्यमातून कामगारांना मोठ्या प्रमाणात विविध प्रकारच्या योजनांचा लाभ दिला जात आहे, त्यामध्ये भांडी वाटप त्याच पद्धतीने सेफ्टी कीट अशा विविध प्रकारच्या योजनांचा लाभ अशा कामगारांना दिला जात आहे, परंतु यातही मोठ्या प्रमाणात बोगस लाभार्थ्याचे ग्रहण या योजनेला लागताना दिसत आहे, व याबाबतच काही बाबी शासनाकडे गेलेल्या असल्याने शासनाच्या माध्यमातून एक मोठे पाऊल उचलले गेलेले आहे, त्यामुळे तुम्ही जर बांधकाम कामगार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.
बांधकाम कामगारांना मागील काही दिवसांपूर्वी म्हणजेच विविध जिल्ह्यांमध्ये विविध कालावधीमध्ये मोफत भांडी वाटप सेफ्टी किटचे वाटप करण्यात आले, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात बोगस लाभार्थी बघायला मिळाले व अनेक नागरिक कामगार नसून सुद्धा त्यांच्या घरची परिस्थिती चांगली असून भांडे वाटप संचा चा लाभ घेताना दिसले, त्याच पद्धतीने विविध प्रकारच्या योजना बांधकाम कामगारांसाठी राबवल्या जातात त्यामध्ये कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्ती योजना तसेच विविध प्रकारच्या योजना या असतात अशा योजनांचा लाभ सुद्धा बोगस लाभार्थ्यांच्या माध्यमातून घेतला जात आहे.
बोगस लाभार्थ्यांची तपासणी सुरू
शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या निर्णयानुसार दहा जुलै 2025 पर्यंत बोगस लाभार्थ्यांची चौकशीची मोहीम चालू करण्यात आलेली आहे, लाभ दिला जात असताना पैसे मागण्याची किंवा खऱ्या कामगारांना योजनांचा लाभ न मिळू देणे अशा प्रकारच्या विविध बाबी पुढे येत असल्याने त्यांची आता चौकशी केली जाणार असून 10 जुलैपर्यंत शोध मोहीम केली जाणार आहे. अशाप्रकारे या मोहिमेमुळे बोगस लाभार्थ्यांना योजनेतून बाद केले जाईल.