निराधार योजनेचे 1500 रु आले की नाही? लगेच पहा ऑनलाईन मोबाईल वरून | Niradhar Yojana Installment Check Online

राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत त्याच पद्धतीने श्रावण बाळ या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी लाभ घेतात व प्रत्येक महिन्याला 1500 रुपये एवढा लाभ लाभार्थ्यांच्या खात्यावर पाठवला जातो, परंतु अनेक वेळा संजय गांधी निराधार योजना सारख्या अशा योजनांचे पैसे आले की नाही, याबाबत लाभार्थ्यांना चिंता लागलेली असते, त्यामुळे आता ऑनलाइन पद्धतीने स्वतःच्या मोबाईलवरून सुद्धा योजनेच्या पेमेंट संबंधित संपूर्ण माहिती बघता येणार आहे, ती कशा पद्धतीने बघायची? ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात.

 

संजय गांधी निराधार योजनेचे पैसे आले की नाही हे चेक करण्याची संपूर्ण प्रोसेस

 

  • ऑनलाइन पद्धतीने सर्व पेमेंटची स्थिती चेक करण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत संकेतस्थळ ओपन करावे.

 

  • त्यानंतर लाभार्थी स्तीथी हे एक ऑप्शन दाखवले जाईल ते ऑप्शनला ओपन करून, सर्च बाय आधार नंबर हे ऑप्शन सिलेक्ट करा.

 

  • आधार क्रमांक, आधार क्रमांक च्या बॉक्स मध्ये एंटर करा, त्याच पद्धतीने स्क्रीनवर दाखवलेला कॅपच्या कोड जशास तसा त्या कोडच्या बॉक्समध्ये एंटर करून जनरेट ओटीपी हे ऑप्शन निवडा.

 

  • तुमच्या मोबाईलवर आलेला ओटीपी एंटर करा व गेट डाटा हे ऑप्शन निवडा. त्यानंतर डेस्कटॉप साईड हे ऑप्शन ऑन करायचे आहे.

 

  • त्यानंतर निराधार योजने संबंधित असलेल्या सर्व योजनांची यादी तुमच्यासमोर ओपन होईल.

 

  •  त्यामध्ये तुम्ही वर्ष निवडू शकता वर्ष 2024-25 किंवा 25-26 यामधील सर्व तुम्हाला मिळालेल्या पेमेंटची स्थिती दिसेल.

 

  • त्यामध्ये तुमचे पेमेंट किती तारखेला आलेली आहे? कोणत्या बँकेमध्ये आलेले आहे, बँकेचा अकाउंट नंबर त्याच पद्धतीने किती रुपये आलेले आहे अशी सर्व माहिती त्या ठिकाणी दाखवली जाईल.

निराधार योजनेचे 1500 रुपये चेक करण्यासाठी वेबसाईट: https://sas.mahait.org/

बांधकाम कामगार भांडी वाटप योजना ऑनलाईन अर्ज सुरू, ऑनलाइन अर्ज करण्याची संपूर्ण प्रोसेस 

Leave a Comment

WhatsApp Icon