गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध भागांमध्ये हलक्या ते मध्यम तर काही भागांमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडतो आहे, त्याच पद्धतीने शेतकऱ्यांनी सुद्धा खरीप हंगामाच्या पेरण्या पूर्ण केलेल्या आहे व काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी झाडांची पडझड सुद्धा बघायला मिळाली, व राज्यामध्ये पुन्हा एकदा चार ते सहा तारखे दरम्यान विविध भागांमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडू शकतो अशा प्रकारचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
6 जुलैपासून राज्यातील विदर्भ व मराठवाड्यामध्ये पावसाचे प्रमाण वाढणार असल्याचे हवामान विभागाच्या माध्यमातून सांगण्यात आलेले आहे, महाराष्ट्रातील कोकण तसेच घाट परिसरामध्ये पावसाचे प्रमाण वाढू शकते, तर विदर्भातील काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे.
महाराष्ट्रातील पुणे या ठिकाणी सुद्धा चांगल्या स्वरूपाचा पाऊस आलेला आहे, त्याच पद्धतीने येत्या काही दिवसात हलक्या ते साधारण मध्यम स्वरूपाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे, राज्यातील मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागांमध्ये पावसाचे प्रमाण वाढेल, पालघर मध्ये सुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडेल त्याचप्रमाणे राज्यातील विविध भागांमध्ये काही भागात मध्यम ते काही भागांमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
ई पिक पाहणी बाबत शासनाचा मोठा निर्णय, शेतकऱ्यांसाठी एक नवीन सुविधा