तुम्ही जर कर्जदार असाल व तुमचे कर्ज फेडताना तुम्हाला अतिरिक्त भरावयाच्या शुल्का बाबत चिंता लागलेली असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे, आरबीआयने नवीन नियम जाहीर केलेला आहे, व त्या नवीन नियमानुसार कर्जफेडीच्या कालावधी संबंधित व भरावयाच्या शुल्क संबंधित माहिती दिलेली आहे, व हा नवीन नियम 1 जानेवारी 2026 पासून लागू होणार आहे, त्यामुळे नेमका हा नियम काय आहे हे जाणून घेऊयात.
एखाद्या कर्जदाराने कर्ज उचलले असता परत करत असताना अतिरिक्त शुल्क त्या कर्जावर लादले जाते, परंतु आता आरबीआयने दिलेल्या नवीन माहितीनुसार जर कर्जदाराने कर्ज उचलले व ठराविक कालावधीच्या आत पैशाची परतफेड केली तर त्यावर लागणारे अतिरिक्त शुल्क लावले जाणार नाहीये, यापूर्वी मात्र ठराविक कलावधीमध्ये कर्ज परतफेड केले तरी सुद्धा हे शुल्क आकारले जात होते, परंतु आता मात्र कर्जदारांना ठराविक कालावधीत कर्ज परतफेड केल्यास अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नाही.
अनेकांना प्रश्न पडलेला असेल की 50 लाखाचे जर कर्ज काढले व ठराविक कालावधीमध्ये परत केले तर त्यावर सुद्धा शुल्क भरावे लागणार नाही का? तर आरबीआयच्या नवीन नियमानुसार तुम्ही जर 50 लाखाची कर्ज काढले व ठराविक कालावधीमध्ये परत फेड केली तर यावर सुद्धा अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नाही. वैयक्तिक कर्ज, गृह कर्ज, बीगर व्यवसाय कर्जे अशा सर्व कर्जांवर आरबीआयचा नवीन नियम लागू होणार आहे.
या महिलांचे लाडकी बहिणी योजना चे 1500 रुपये होणार बंद? जाणून घ्या कोणत्या आहेत त्या महिला