खरीप पीक विमा 2025 ची अर्ज प्रक्रिया चालू झालेली आहे, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना प्रश्न पडलेले होते की आपण स्वतःच्या मोबाईलच्या माध्यमातून पिक विमा भरता येणार की नाही तर शेतकऱ्यांना तुम्हाला स्वतःच्या मोबाईलवरून सुद्धा खरीप पिक विमा भरता येणार आहे व खरीप पिक विमा संबंधित अर्ज करण्याच्या संपूर्ण प्रोसेस ची माहिती आपण खालील प्रमाणे जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात.
खरीप पिक विमा 2025 अर्ज प्रोसेस
- खरीप पिक विमा भरण्यासाठी सर्वप्रथम मोबाईल मध्ये क्रॉप इन्शुरन्स हा ॲप इंस्टॉल करा, त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकून ओटीपी एंटर करून संपूर्ण माहिती ओपन होईल. जर तुम्ही यापूर्वी मोबाईलच्या माध्यमातून अर्ज केलेला नसेल तर तुम्हाला संपूर्ण माहिती भरून नंतर मोबाईल क्रमांक टाकून व ओटीपी टाकून संपूर्ण माहिती ओपन होईल.
- PMFBY insurance हे ऑप्शन दिसेल हे ऑप्शन शेतकऱ्यांना सिलेक्ट करावे लागेल, त्यानंतर तुमचे राज्य म्हणजेच महाराष्ट्र निवडा, हंगाम निवडा, त्यामध्ये खरीप नंतर वर्ष निवडा 2025 स्कीम विचारली जाईल त्यामध्ये पी एम एफ बी वाय ही स्कीम निवडा. नंतर सबमिट निवडून नेक्स्ट वर जा.
- त्यानंतर बँक अकाउंट ऍड हे ऑप्शन दिसेल त्यावर जाऊन तुमच्या बँक अकाउंट संबंधित संपूर्ण माहिती एंटर करा, व सेव अँड नेक्स्ट हे बटन निवडून पुढे जा, फार्मर ची माहिती टाकायची आहे आधार कार्ड वर असलेली जशास तशी माहिती विचारली जाईल ती भरा, त्यानंतर तुम्ही तुमच्या शेतीचा फॉर्म भरत असाल तर ओनर हे ऑप्शन निवडा, तालुका, जिल्हा, मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक तुमचा राहत्या ठिकाणचा पत्ता एंटर करा.
- नॉमिनी डिटेल्स विचारल्या जातील नॉमिनी मध्ये ज्या व्यक्तीचे नाव तुम्ही टाकू इच्छित असाल त्याचे नाव इंटर करा त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट निवडा, तुमचा जिल्हा, तालुका, तुमची ज्या ठिकाणी शेती आहे ते गाव त्याचप्रमाणे महसूल मंडळ निवडा, ग्रामपंचायत अशी संपूर्ण माहिती निवडून सेव्ह अँड नेक्स्ट वर जा, एकच पीक घेतलेली आहे की मिश्र पीक आहे ते निवडा व कोणते पीक आहे ते सुद्धा नाव निवडा.
- तुम्ही कोणत्या तारखेला पिकाची लागवड केलेली आहे ती तारीख निवडा, खाते नंबर व गट नंबर एंटर करा, नंतर प्रोसीड हे ऑप्शन निवडा, त्यानंतर तुम्ही ती ज निवडलेली पिके किती क्षेत्रांमध्ये घेणार आहात एक हेक्टर दोन हेक्टर अशे निवडा. तुम्हाला किती रुपये भरायचे आहे ते सुद्धा दाखवले जाईल व प्रोसिड करून इतर पिके निवडायची असल्यास अशाच पद्धतीने निवडा.
- त्यानंतर डॉक्युमेंट अपलोड करावे लागेल, त्यामध्ये पासबुक अपलोड करावे लागेल. लँड रेकॉर्डमध्ये सातबारा व आठ अ अपलोड करा, पिक पेऱ्याचे स्वघोषणापत्र अपलोड करा त्यानंतर तुम्हाला एकूण किती रुपये भरावे लागेल? हे दाखवले जाईल त्यानंतर प्रोसिडवर जाऊन पेमेंट ऑनलाईन पद्धतीने करा. अशा पद्धतीने शेतकरी स्वतःच्या मोबाईलवरून पिक विमा साठी अर्ज करू शकतात.
नवीन स्वस्त धान्य दुकान करिता अर्ज सुरू, आता स्वतःचे रेशन धान्य दुकान सुरू करा, लगेच करा अर्ज