राज्यांमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली जात आहे, या योजनेच्या माध्यमातून 11 हप्त्यांचे वितरण केलेले असून बारावा हप्ता सुद्धा वितरणास सुरुवात झालेली आहे, त्यामुळे अनेक महिलांना प्रश्न पडलेला आहे की आपला हप्ता जमा झाला किंवा नाही? व हप्ता कधी कशा पद्धतीने चेक करायचा? तसेच हप्त्याबाबत पुष्टी कशी करायची? अशी संपूर्ण माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात.
अदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावर हत्या वितरणाची प्रक्रिया चालू झालेली आहे, त्यामुळे काही लाडक्या बहिणीच्या खात्यात हप्ता जमा झालेला आहे तर काहींच्या खात्यामध्ये लवकरच हा हप्ता जमा होईल त्यामुळे तुमचा हप्ता जमा झाला की नाही हे चेक करण्यासाठी काही पद्धती आहे त्या पद्धतीने नुसार लाडक्या बहिणींचा हप्ता चेक केला जाऊ शकतो.
हप्ता आला की नाही? चेक करण्यासाठी खालिल काही पर्याय:
- लाडक्या बहिणीचा हप्ता आला की नाही हे चेक करण्यासाठी तुम्ही कस्टमर केअरला फोन करून त्या ठिकाणी खात्यातील पैशाची माहिती मिळवून घेऊ शकता.
- तुमच्या आधार कार्ड ला जे खाते लिंक असेल त्या खात्याचे स्टेटमेंट तुम्ही आधार कार्ड च्या माध्यमातून काढू शकता. त्यासाठी बँकेत किंवा सेतू केंद्रांमध्ये ही सुविधा उपलब्ध होईल.
- अनेक बँकांच्या माध्यमातून सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहे थेट तुमचा जर छोटा मोबाईल असेल तर बँकेला मिस कॉल दिल्यानंतर दोन सेकंदांमध्ये तुम्हाला मेसेज येईल त्यामध्ये तुमचा हप्ता आलेला आहे की नाही हे तुम्ही पडताळू शकता.
- UIDAI पोर्टलवर जाऊन मोबाईल क्रमांक एंटर करून आधार क्रमांक टाकून तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या लिंक असलेल्या खात्याची माहिती बघू शकता त्या ठिकाणी लाडकी बहीण योजना असे नाव लिहून येत असल्यास तो हप्ता तुमचा जमा झालेला असेल.
- ज्या लाडक्या बहिणी फोन पे, गुगल पे अशा प्रकारचे ऑप्शन्स त्यांच्याकडे असेल त्यांना थेट मोबाईलच्या माध्यमातून सुद्धा हप्ता आलेला आहे की नाही हे चेक करता येईल.
- अशा प्रकारचे काही ऑप्शन लाडक्या बहिणींना आहे व या व्यतिरिक्त थेट बँकेत जाऊन सुद्धा लाडकी बहिण योजनेचा हप्ता जमा झालेला आहे की नाही हे चेक करता येऊ शकते ,अशा प्रकारे लाडक्या बहिणींनो हप्ता वितरणास सुरुवात झालेली आहे त्यामुळे तुमचा हप्ता जमा झाला की नाही हे तुम्ही चेक करू शकता.
या महिलांचे लाडकी बहिणी योजना चे 1500 रुपये होणार बंद? येथे जाणून घ्या कोणत्या आहेत त्या महिला