शेतकऱ्यांना मिळणार ऑनलाइन पीक कर्ज, जन समर्थक KCC पोर्टल लॉन्च, कोणत्याही कागदपत्रा शिवाय पीक कर्ज उपलब्ध होणार | Pik Karj Portal Lonch 

शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी केंद्र शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने पीक कर्ज उपलब्ध व्हावे, यासाठी केसीसी पोर्टल लॉन्च केलेले आहे, ॲग्री स्टेकच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढलेला आहे अशा शेतकऱ्यांना पिक कर्ज ऑनलाईन पद्धतीने काढता येणार आहे, यापूर्वी सुद्धा सांगण्यात येत होते की शेतकऱ्यांना ऑनलाइन पोर्टल उपलब्ध करून कोणत्याही कागदपत्राची वैयक्तिक कर्ज उपलब्ध करून देऊ असे सांगितले होते, व आता ही सर्व प्रक्रिया प्रत्यक्षात आणण्यात आलेली आहे.

 

फार्मर आयडी सर्व शेतकऱ्यांनी काढलेला आहे, व फार्मर आयडी आता पिक विमा भरताना त्याच पद्धतीने विविध प्रकारचे योजनांचे अर्ज भरताना शेतकऱ्यांना भरावा लागतो, फार्मर आयडी च्या माध्यमातून शेतकऱ्यांना सर्व प्रकारच्या योजनांचा लाभ दिला जाणार आहे व त्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी असेल अशा शेतकऱ्यांना केसीसी पोर्टलच्या माध्यमातून आता ऑनलाइन पद्धतीने कोणतेही कागदपत्राशिवाय पिक कर्ज घेता येणार आहे, या पोर्टलच्या माध्यमातून एकूण सहा प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे.

 

ॲग्री स्टॅक वरून सुद्धा शेतकऱ्यांना तुम्ही केसीसी साठी पात्र आहात की नाही, हे सहजरीत्या चेक करता येणार आहे, त्याच पद्धतीने शेतकऱ्यांना आता ऑनलाईन पद्धतीने केसीसी साठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करून तुमच्या जवळपास असलेल्या बँकेमध्ये किंवा तुमचे ज्या बँकेचे खाते आहे अशा बँकेसाठी तुम्ही केसीसी करिता अप्लाय करू शकता. अशाप्रकारे शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी म्हणजेच KCC सुविधा ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध झालेली आहे.

 

बांध कोरणाऱ्या शेतकऱ्यांना असा घाला आळा, शेत जमिनीचा बांध कोरल्यास कायदेशीर उपाय

Leave a Comment

WhatsApp Icon