अल्पभूधारक शेतकरी प्रमाणपत्र काढण्याची ऑनलाइन प्रोसेस, याच शेतकऱ्यांना मिळणारी सर्व योजनांचा लाभ | Alpbhudark Pramanptra 

Aapla shetkari

अल्पभूधारक शेतकरी प्रमाणपत्र काढण्याची ऑनलाइन प्रोसेस, याच शेतकऱ्यांना मिळणारी सर्व योजनांचा लाभ | Alpbhudark Pramanptra 

Alpbhudark Pramanptra, अल्पभूधारक शेतकरी प्रमाणपत्र काढण्याची ऑनलाइन प्रोसेस, याच शेतकऱ्यांना मिळणारी सर्व योजनांचा लाभ, सरकारी योजना

शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी तुमच्याकडे जर पाच एकर एवढी जमीन असेल किंवा पाच एकरापेक्षा कमी जमीन असेल तर ही बातमी अत्यंत महत्त्वाची ठरू शकते, कारण राज्य शासन व केंद्र शासन यांच्या माध्यमातून विविध प्रकारच्या योजना राबवल्या जातात, व यामध्ये मुख्यतः अल्पभूधारक शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाते, त्यामुळे तुम्ही जर अल्पभूधारक शेतकरी असाल तर तुम्हाला योजना चा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अल्पभूधारक प्रमाणपत्र काढता येणार आहे. त्यामुळे ऑनलाईन पद्धतीने अल्पभूधारक प्रमाणपत्र कसे काढायचे. याची काय प्रोसेस आहे ही संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊयात.

 

अल्पभूधारक प्रमाणपत्र ऑनलाइन प्रोसेस

 

  • अल्पभूधारक प्रमाणपत्र काढण्यासाठी शेतकऱ्यांनी सर्वप्रथम अधिकृत संकेतस्थळ ओपन करावे, त्यानंतर शेतकऱ्यांना मोबाईल क्रमांक टाकून ओटीपी व कोड टाकून एंटर करावे लागेल त्या ठिकाणी लॉगिन करून घ्या.

 

  • लॉगीन आयडी तुम्हाला त्या ठिकाणी तयार करता येणार आहे, संपूर्ण पेज ओपन झाल्यानंतर अल्पभूधारक शेतकरी प्रमाणपत्र हे ऑप्शन दिसेल त्या ऑप्शनला निवडा.

 

  • त्यानंतर तुमच्याकडे असलेली शेतीची माहिती तुमचे नाव, गाव, पत्ता, तुमचा मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक, किती एकर शेती आहे? ती सर्व माहिती तुम्हाला विचारली जाईल ती संपूर्ण माहिती योग्य प्रकारे भरून घ्यावी.

 

  • त्यानंतर तुम्हाला विचारलेल्या माहिती संबंधित काही आवश्यक कागदपत्रे अपलोड करावे लागणार आहे, त्यामध्ये आधार कार्ड शेती विषयक काही कागदपत्रांचा समावेश आहे, व काही ठराविक साईजमध्ये ती अपलोड करावी. व अर्ज सबमिट करावा.

 

  • अर्ज शुल्क भरून त्याची पावती तुम्हाला मिळेल, तुमच्याकडे जर पाच एकर किंवा पाच एकर पेक्षा कमी जमीन असेल तर तुम्ही अल्पभूधारक शेतकरी आहात ही बाब लक्षात ठेवून तुम्ही अल्पभूधारक प्रमाणपत्र वरील पद्धतीने काढू शकता.

 

गेल्या पाच ते सहा दिवसात एवढ्या शेतकऱ्यांनी उतरवला पीक विमा, तुम्ही पीक विमा काढला का? 

Leave a Comment

WhatsApp Icon