दिवसेंदिवस ऑनलाइन पद्धतीने सर्व सुविधा उपलब्ध होत चाललेले आहे व नागरिक सुद्धा या गुगल पे व फोन पे सारख्या ऑनलाइन पेमेंट सुविधा चा वापर मोठ्या प्रमाणात करत आहे, त्यामध्ये फोन पे व गुगल पे यांचा वापर मोठ्या प्रमाणात होतो, परंतु वापर करत असताना काही आवश्यक बाबी लक्षात घेऊन संबंधीत काळजी राखून फोन पे अथवा गुगल पे चा वापर करणे आवश्यक आहे.
आपल्याला तर माहीतच आहे दिवसेंदिवस हॅकिंग किंवा एखादी लिंक पाठवून त्यावर क्लिक केल्यानंतर एका मिनिटात पैसे गायब होणे अशा सर्व प्रक्रिया घडताना दिसतात, यामध्ये मोठ्या प्रमाणात फ्रॉडच्या केसेस पुढे येत आहेत, त्यामुळे तुम्हाला जर तुमचे पैसे सुरक्षित ठेवायचे असेल तर यूपीआय ॲप्स वापरत असताना दक्षता घेणे आवश्यक आहे.
फोन पे किंवा गुगल पे वापरताना ही काळजी घ्या
- जर कोणी तुम्हाला तुमचा पिन किंवा ओटीपी मागत असेल, तर कधीही कुणाला देऊ नका, कारण कोणतीही कंपनी किंवा कोणतीही बँक ही तुम्हाला ओटीपी मागत नाही, त्यामुळे तुम्हाला जर ओटीपी मागण्याचा प्रयत्न कोणी केला तर तो ओटीपी देऊ नका, अन्यथा तुमचे एका मिनिटात अकाउंट खाली सुद्धा होऊ शकते.
- अनेकदा हॅकर्स अनोळखी लिंक पाठवतात व आपण सुद्धा त्या लिंक वर क्लिक करतो व त्या संबंधित माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करतो परंतु कोणत्याही अनोळखी लिंक वर क्लिक करणे सुद्धा धोकादायक ठरू शकते.
- अनोळखी क्यूआर कोड स्कॅन करणे सुद्धा धोकादायक ठरत आहे, अनोळखी क्यूआर कोडला स्कॅन करू नये.
- त्याच पद्धतीने अनोळखी कॉल वरून तुम्ही लॉटरी जिंकलेली आहे किंवा तुमची केवायसी करायची आहे, अशा प्रकारची माहिती देऊन ओटीपी किंवा सर्व माहिती विचारली जाते व अशा माहितीवरून ओटीपी वरून तुमचे अकाउंट सुद्धा हॅक करून पैसे गायब केले जातात.
- फसवणुकीसाठी नकली ॲप्स सुद्धा आहे, त्यामुळे इन्स्टॉल करत असताना डायरेक्ट प्ले स्टोअर वर जाऊनच ॲप इंस्टॉल करणे फायद्याचे ठरेल.
- बँकेमध्ये व्यवहार केल्यानंतर आलेले एसएमएस योग्य प्रकारे वाचा व अनोळखी एसएमएस वगैरे आढळल्यास थेट बँकेशी संपर्क साधा.
- सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे तुमचा फोन हरवल्यास त्वरित ॲप ब्लॉक करून टाका, व दैनंदिन वापराची मर्यादा सुद्धा कमी ठेवा म्हणजेच तुम्ही मोठ्या फसवणुकीला बळी पडू शकणार नाही.


