शेत जमिनीची वाटणी करण्याबाबत कायदेशीर बाबी, काय म्हणतो कायदा, एकदा बघाच! | Sheti Vatni Kayada 

वडिलोपार्जित जमीन किंवा स्वतःच्या मालकी हक्काची जमीन यामध्ये वाटण्यात कशा केल्या जातात? यामध्ये वारसदारांचे नाव चढते का? यामध्ये कायदेशीर बाब कोणती आहे व कशा पद्धतीने वाटल्या केल्या जाव्या, या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण खालील प्रमाणे जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात.

 

सर्वप्रथम वडिलोपार्जित जमिनी बद्दल बोलायचे झाल्यास वडिलांच्या मृत्यूपूर्वी जर त्यांना जमिनीची वाटणी करायची नसेल, तर ते सर्वस्वी त्यांचा निर्णय असेल त्यामध्ये जर त्यांचा मृत्यू झाला तर त्यानंतर वारसदारांच्या नावे ती जमीन उतरून घेतली जाऊ शकते, त्यामध्ये मुलगा, मुलगी व पत्नी अशा वारसदारांचा समावेश होतो.

 

जमीन वडीलोपार्जित नसून स्वतःच्या मालकीची असेल तर त्यामध्ये स्वतः त्या मालकाला जमीन कुणालाही देण्याचा अधिकार आहे, यामध्ये वारसदार सुद्धा काहीही करू शकणार नाही, कारण ती जमीन त्यांनी कमावलेली स्वतःच्या मालकीची जमीन आहे, यामध्ये मृत्युपत्र तयार करून ती जमीन कोणालाही देण्याचा अधिकार सर्वस्वी मालकाचा असेल.

 

जर जमिनीच्या वाटणीपूर्वी मालकाचा मृत्यू झाला व त्या संबंधित मृत्यूपत्र सुद्धा नसेल तर अशावेळी ती जमीन वारसदारांमध्ये वाटून दिली जाते, तलाठी कार्यालयामध्ये अर्ज करून त्यामध्ये ती जमीन वारसदारांमध्ये वाटून घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाते, जमीन वारसदारांच्या नावाने करत असताना, वारस असल्याचे पुरावा असावा. व जमिनीची वाटणी करत असताना प्रत्येक हिस्सेदाराला जमिनीसाठी रस्ता असावा यानुसार वाटणी करून विभागणी केली जाते अशा प्रकारे जमिनीची वाटणी संदर्भात वरी महत्त्वाच्या बाबी आहे.

 

वारसा हक्क नोंदणी प्रोसेस कशी केली जाते? नोंदणीसाठी लागणारा कालावधी, आवश्यक कागदपत्रे व संपूर्ण माहिती

Leave a Comment

WhatsApp Icon