तुकडे बंदी कायदा शिथील करण्याचा शासनाचा मोठा निर्णय, लहान तुकड्यातील जमीन खरेदी विक्री करता येणार | Tukade Bandi Kayda 

तुकडे बंदी कायदा शिथील करण्याचा मोठा निर्णय शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे, तुकडे बंदी कायदा काय आहे? तुकडे बंदी कायद्याच्या शिथील ते मुळे नेमके कोणते फायदे?नागरिकांना मिळणार आहे, त्याच पद्धतीने अधिवेशनात या संबंधित कशा प्रकारचा निर्णय घेण्यात आला, अशी संपूर्ण माहिती आपण खालील प्रमाणे जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात.

 

तुकडे बंदी कायद्यानुसार खूप कमी क्षेत्र म्हणजेच काही क्षेत्रासाठी जिरायत बागायत यामधील 10 ते 20 गुंठे पर्यंतची मर्यादा आहे या मर्यादेपेक्षा कमी क्षेत्र असल्यास त्याची विक्री किंवा खरेदी केली जाऊ शकत नाही, अशा प्रकारच्या काही अटी तुकडे बंदी कायद्याच्या माध्यमातून काढण्यात आलेल्या होत्या, परंतु या तुकडेबंदी कायद्यामुळे मोठ्या प्रमाणात अडचणी भासत होत्या एखाद्या व्यक्तीला जागा खरेदी करायची झाल्यास ती जागा ठरावीक गुंठ्यापेक्षा कमी असल्यास त्याची खरेदी विक्री केली जाऊ शकत नव्हती त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणी भासत होत्या.

 

पावसाळी अधिवेशनामध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांनी तुकडे बंदी कायदा संबंधित मोठा निर्णय घेतला, व त्या निर्णयानुसार एक गुंठा किंवा त्यापेक्षाही कमी क्षेत्राची खरेदी विक्री केली जाऊ शकनार आहे, व या संबंधित सर्व कार्य करण्यासाठी एक समिती गठित केली जाणार आहे व जानेवारी 2025 महिन्यापर्यंत रखडलेल्या सर्व व्यवहारांना गती मिळणार आहे.

 

कायद्याच्या शितीलतेमुळे अगदी शहरी किंवा ग्रामीण क्षेत्रांमध्ये जे नागरिक घर बांधण्याकरिता जमीन खरेदी करू इच्छितात, अशांना आता छोट्या छोट्या जमिनीची खरेदी करता येणार आहे, अशा प्रकारचा शासनाने घेतलेला हा निर्णय सर्व नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

 

कर्ज फेडी संदर्भात आरबीआयचा मोठा निर्णय, आता कर्ज फेडणं झालं सोप्प

Leave a Comment

WhatsApp Icon