राज्यातील सर्व बांधकाम कामगारांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी, राज्यामध्ये बांधकाम कामगार योजना राबवली जाते, योजनेच्या माध्यमातून विविध प्रकारचा लाभ बांधकाम कामगारांना दिला जातो, परंतु दिवसेंदिवस बांधकाम कामगार योजनेमध्ये सुद्धा फसवणुकीच्या बाबींचा समावेश होताना दिसतो, त्याच पद्धतीने शासनाकडे याबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी आलेल्या असल्याने शासनाच्या माध्यमातून एक निर्णय घेण्यात आलेला असून बांधकाम कामगारांना नवीन नियमानुसार कोणती प्रक्रिया करावी लागणार अशी संपूर्ण माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात.
बांधकाम कामगारांना इफेशियल किट त्याच पद्धतीने भांडीवाटप संच व सेफ्टी किट यांचा लाभ दिला जातो व मागील काही दिवसांपूर्वी भांडी वाटप योजना चालू असल्याने या योजने दरम्यान मोठ्या प्रमाणात बोगस नोंदणी प्रक्रिया करून, नागरिकांनी लाभ घेतला त्याच पद्धतीने योजनेमध्ये भांडी वाटप करताना सुद्धा मोठ्या प्रमाणात घोटाळे आढळून आले व याचाच एक परिणाम म्हणून अधिवेशनामध्ये यावर मुद्दा उठवण्यात आला व शासनाने घेतलेल्या या नवीन निर्णयानुसार आता बांधकाम कामगारांना बायोमेट्रिक नोंदी करावी लागणार आहे.
नोंदणी प्रक्रिया पूर्ण करत असताना थम लावून बायोमेट्रिक नोंदणी करावी लागेल, यापूर्वी ओटीपी च्या माध्यमातून सुद्धा नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली जात होती, परंतु ओटीपी च्या माध्यमातून खोटे लाभार्थी सुद्धा लाभ घेत होते, व आता बायोमेट्रिक नोंदणी प्रक्रिया चालू झालेली असल्याने आता कोणत्याही प्रकारच्या खोट्या लाभार्थ्याला बांधकाम कामगार योजनेच्या माध्यमातून लाभ घेता येणार नाही, अशा प्रकारची शासनाची अत्यंत महत्त्वाची बातमी आहे.
बांधकाम कामगार भांडी वाटप योजना, भांडी वाटप करण्यासाठी अशी करा नोंदणी, तर मिळेल भांडी