पिक विमा योजनेत यावर्षी कर्जदार शेतकऱ्यांना सहभागी होता येणार की नाही? काय आहे प्रोसेस, बघा संपूर्ण माहिती | Sudharit Pik Vima Yojana 

Aapla shetkari

पिक विमा योजनेत यावर्षी कर्जदार शेतकऱ्यांना सहभागी होता येणार की नाही? काय आहे प्रोसेस, बघा संपूर्ण माहिती | Sudharit Pik Vima Yojana 

Sudharit Pik Vima Yojana, काय आहे प्रोसेस, पिक विमा योजनेत यावर्षी कर्जदार शेतकऱ्यांना सहभागी होता येणार की नाही?, शेतकऱ्यांना पिक विमा भरता येणार की नाही?

या वर्षी पिक विमा योजना चालू करण्यात आलेली आहे, या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पिक विमा भरत असताना, पिक विम्याची रक्कम भरावी लागणार आहे, प्रत्येक पिकासाठी वेगवेगळ्या प्रकारची रक्कम वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या टक्केवारीनुसार भरावी लागेल, परंतु यातील महत्त्वाची बाब म्हणजे जे शेतकरी कर्जदार आहे, अशा शेतकऱ्यांचे काय? अशा शेतकऱ्यांना पिक विमा भरता येणार की नाही? मोठा प्रश्न आहे तर जाणून घेऊया याच प्रश्नाबाबत संपूर्ण माहिती.

 

ज्या शेतकऱ्यांना पिक विमा योजनेमध्ये सहभाग नोंदवायचा आहे असे शेतकऱ्यांना, ज्या बँकेतून कर्ज काढलेले आहे त्या बँकेमध्ये जाऊन घोषणापत्र द्यावी लागणार आहे, जर शेतकऱ्याला पिक विमा भरायचे असेल तर त्याबाबतचे सहमतीचे घोषणापत्र व जर शेतकऱ्याला पिक विमा योजने सहभाग नोंदवायचा नसेल तर त्याविषयीची नकाराचे घोषणापत्र द्यावे लागेल, यामधील महत्त्वाची बाब म्हणजेच ज्या शेतकऱ्यांनी घोषणापत्र दिले नाही अशा शेतकऱ्यांचा पिक विमा भरला जाईल, त्यामुळे पिक विमा भरायचा नसेल तरीसुद्धा घोषणापत्र देणे आवश्यक आहे.

 

घोषणापत्र बँकेमध्ये जमा करण्याची सर्व प्रक्रिया शेतकऱ्यांनी पिक विमा योजनेचा अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेच्या 7 दिवस आधीच पुर्ण करावी. कारण त्यानंतर बँकेला या संबंधित सर्व शेतकऱ्यांची यादी सुद्धा लावावी लागते अशा प्रकारे जे शेतकरी कर्जदार आहेत अशा शेतकऱ्यांसाठीची अत्यंत महत्त्वाची बातमी असून सर्व शेतकऱ्यांनी बँकेमध्ये जाऊन घोषणापत्र देणे आवश्यक असणार आहे.

 

पिक विमा भरताना ही चूक केल्यास, शेतकऱ्याचे नाव काळ्या यादीत जाणार, व सोबतच कारवाही होणार

Leave a Comment

WhatsApp Icon