विधवा, अपंग व निराधार पेन्शन चालू ठेवण्यासाठी हयातीचा दाखला असा काढा ऑनलाइन | Niradhar Hayat Dakhala

शासनाच्या माध्यमातून निराधार योजना त्याच पद्धतीने श्रावण बाळा सेवानिवृत्ती योजना अशा प्रकारच्या योजना राबवल्या जातात व महिन्याला 1500 रुपये एवढे निराधारांना देण्यात येते, साठ वर्षे वयाच्या वरील नागरी यामध्ये पात्र ठरतात त्यामुळे तुम्ही जर श्रावण बाळ सेवानिवृत्ती योजना किंवा निराधार योजना अशा योजनांची लाभार्थी असाल तर तुम्हाला आता तुमच्या हयातीचा दाखला काढणे अत्यंत आवश्यक आहे, शासनाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेल्या माहितीनुसार निराधार योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना आपल्या हयातीचा दाखला काढावा लागणार आहे.

 

ज्या लाभार्थ्यांनी हयातीचा दाखला काढलेला नाही अशा सर्व लाभार्थ्यांची पेन्शन बंद केली जाणार आहे, त्यामुळे हा हयातीचा दाखला मोबाईलच्या माध्यमातून कसा काढायचा याची संपूर्ण प्रोसेस घेण्याचा प्रयत्न करूया.

 

हयातीचा दाखला काढण्याची संपूर्ण प्रोसेस

 

  • सर्वप्रथम सत्यापण ॲप हे प्ले स्टोअर वर इन्स्टॉल करा. सर्वप्रथम रजिस्ट्रेशन करावे लागेल त्यासाठी मोबाईल नंबर टाका त्यानंतर मोबाईल नंबर वर आलेला ओटीपी इंटर करा.

 

  • त्यानंतर सबमिट करा आधार नंबर टाकून त्या व्यक्तीचे नाव टाका, सेल्फ आणि फॅमिली हे ऑप्शन निवडून, पुन्हा प्ले स्टोर वरून आधार फेस आयडी हा ॲप इंस्टॉल करा.

 

  • त्यानंतर स्कॅन हे ऑप्शन निवडून तुम्ही जो एप्लीकेशन इन्स्टॉल केलेला असेल ती सर्व प्रोसेस त्यामध्ये ओपन होईल व तुमचं स्कॅनिंग चेहऱ्याचं त्या ठिकाणी करावे लागेल.

 

  • मोबाईल मध्ये गोल सर्कल मध्ये आपला चेहरा आला पाहिजे व एकदा डोळे बंद करून ओपन करा व त्यानंतर सर्कल ग्रीन होईल व तुमचे स्कॅनिंग पूर्ण होईल.

 

  • त्यानंतर सेंट्रल गव्हर्मेंट हे ऑप्शन निवडा. बेनिफिशियरी व्हेरीफिकेशन हे ऑप्शन निवडून, आधार नंबर व मोबाईल क्रमांक टाका त्यानंतर सबमिट हे ऑप्शन निवडून मोबाईल नंबर वर आलेला ओटीपी एंटर करा.

 

  • एक ग्रीन टीक जेवण बेनिफिशियली व्हॅलिड हे ऑप्शन दिलेले असे ऑप्शन दाखवत असेल तर तुम्ही पुढील प्रोसेस करून हयातीचा दाखला काढू शकणार आहात, त्यामुळे तुम्हाला दोन ऑप्शन दाखवेल फेस कॅप्चर किंवा फिंगरप्रिंट. फेस कॅप्चर हे ऑप्शन निवडा.

 

  • लाभार्थ्यांचा फेस स्कॅन करा, व इमेज कॅप्चर करून झाल्यानंतर ग्रीन टीक येईल व लगेचच तुमचे हयातीचे प्रमाणपत्र ओपन होईल ही स्टेप तुमची केवायसी ची पूर्ण झालेली असेल.

 

  • सर्टिफिकेट डाऊनलोड करण्यासाठी होम पेजवर येऊन व्ह्यू बेनिफिशियरी सर्टिफिकेट हे ऑप्शन निवडून, मोबाईल नंबर वर आलेला क्रमांक एंटर करा. व सबमिट करून तुमच्यासमोर हयातीचे सर्टिफिकेट ओपन होईल अशा पद्धतीने अत्यंत सहज प्रोसेस मोबाईलच्या माध्यमातून करून निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना हयातीचे सर्टिफिकेट काढता येते.

 

बांधकाम कामगारांना बायोमेट्रिक नोंदणी करावी लागणार, शासनाचा मोठा निर्णय

Leave a Comment

WhatsApp Icon