देशातील शेतकऱ्यांसाठी धन धान्य कृषी योजना राबवण्यास शासनाच्या माध्यमातून मान्यता देण्यात आलेली आहे, निर्मला सीतारामन यांनी यापूर्वी संबंधित घोषणा केलेली होती व आता या योजनेला मंजुरी देण्यात आलेली असल्याने, या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एकूण 36 योजनांची सुविधा मिळवण्यासाठी एकूण 24 हजार कोटी रुपयांचा निधी प्रत्येक वर्षी दिला जाणार आहे.
प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना इथून पुढे सहा वर्षाच्या कालावधीसाठी राबवली जाणारा असून, योजनेच्या माध्यमातून विविध प्रकारच्या सुविधा शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. प्रधानमंत्री धन्य कृषी योजनेच्या माध्यमातून एकूण शंभर जिल्ह्यांची निवड केली जाणार आहे, व 1.60 कोटी शेतकऱ्यांना प्रधानमंत्री धन धान्य कृषी योजनेचा लाभ दिला जाईल.
शेतकऱ्यांसाठी या नवीन सुविधा उपलब्ध होणार
शेतकऱ्यांना धनधान्य कृषी योजनेच्या माध्यमातून बी बियाणे, शेतीसाठी लागणारी विविध अवजारे, खताची खरेदी, विविध प्रकारे शेतकऱ्यांना केली जाणारी आर्थिक मदत अशा सर्व बाबींसाठी शेतकऱ्यांना लाभ दिला जाणार आहे.
शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणाऱ्या आवश्यक तंत्रज्ञानासाठी प्रोसाहित करून अवजाराची उपलब्धता करून देणे, पिकाच्या साठवणुकीसाठी गोदामाची निर्मिती, सिंचन प्रक्रिया मधील सुविधा, ट्रॅक्टर, कृषी पंप, उच्च गुणवत्ता असलेल्या बियाण्यांची उपलब्धता, अशा सर्व बाबींची सुविधा प्रधानमंत्री धन्य कृषी योजनेच्या माध्यमातून 100 जिल्ह्यातील मोठ्या संख्येने शेतकऱ्यांना उपलब्ध होईल. अशाप्रकारे शासनाच्या माध्यमातून प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेला मंजुरी दिलेली आहे.
कापसावर दुसरी फवारणी कधी व कोणत्या औषधाची करायची? व तूर खुडणीचा योग्य कालावधी कोणता?