शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या योजना राबवल्या जात असतात, त्यातीलच बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना ही एक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची योजना आहे, कारण या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विहिरीसाठीची अनुदान दिले जाते, त्याचप्रमाणे विहीर दुरुस्तीसाठीचे अनुदान व विविध बाबींसाठी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते व या संबंधित अर्ज प्रक्रिया चालू झालेली असून योजनेसंबंधी संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात.
बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत विहिरीसाठी मिळणारे अनुदान
- नवीन विहिरीसाठी- 4 लाख रुपये
- जुनी विहीर दुरुस्ती- 1 लाख रुपये
- परसबागेसाठी- 5 हजार रुपये
- पीव्हीसी पाईप साठी- 50000 रूपये
- डिझेल पंपासाठी- 40 हजार रुपये
- शेततळे प्लास्टिक अस्तरीकरणासाठी- 2 लाख
- पंप सेटसाठी वीज जोडणी – 20 हजार रुपये
योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- उत्पन्नाचा दाखला
- सातबारा उतारा
- आठ अ
- रहिवासी दाखला
- मोबाईल क्रमांक
- बँक पासबुक
- रेशन कार्ड
- तलाठीचा दाखला
- बाँड प्रतिज्ञापत्र
- जात वैधता दाखला
बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेत कोणते शेतकरी पात्र?
- उत्पन्न 1.5 लाखापेक्षा कमी असावे
- अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाभार्थी पात्र
- अनुसूचित जमाती असल्याबाबतचा जातीचा दाखला
- जमीन असणे आवश्यक
अशाप्रकारे शेतकऱ्यांना वरील पात्रता वरील कागदपत्रे व संपूर्ण बाबींचा लाभ बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत घेता येतो, त्यामध्ये अर्ज करण्यासाठी महाडीबीटीच्या पोर्टल वर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया शेतकरी करू शकणार आहे, त्यामुळे तुम्ही जर अनुसूचित जमाती या प्रवर्गातील असाल तर या योजनेच्या माध्यमातून विहीर अनुदानाचा मोठा लाभ तुम्हाला मिळू शकता.