शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी, ई पीक पाहणीची तारीख ठरलेली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी ठराविक तारखेदरम्याने ई पिक पाहणी करणे अत्यंत आवश्यक असणार आहे, 30 जुलैपर्यंत ई पिक पाहणी ची प्रक्रिया बंद ठेवली जाणार असून, त्यानंतर 1 ऑगस्ट पासून ते 15 सप्टेंबर या तारखेपर्यंत ई पीक पाहणी शेतकऱ्यांना करता येणार आहे. त्यामुळे जे शेतकरी ई पिक पाहणी करणार नाही अशा शेतकऱ्यांना मात्र कोणत्याही योजना चा लाभ दिला जाणार नाही त्यामुळे या संबंधित ई पीक पाहणी करणे अत्यंत आवश्यक आहे.
शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सर्व सुविधा प्राप्त व्हाव्या शेतकऱ्यांचा सर्व डाटा एका ठिकाणी उपलब्ध व्हावा यासाठी फार्मर आयडी तयार करण्यात आलेला आहे, प्रत्येक शेतकऱ्याकडे फार्मर आयडी असल्याने जे शेतकरी ई पीक पाहणी करतील अशा शेतकऱ्यांचा ई पीक पाहणी मध्ये नोंदवलेल्या सर्व पिकांचा डाटा हा फार्मर आयडी मध्ये उपलब्ध होईल व शेतकरी जर योजनांचा लाभ घेऊ इच्छित असाल तर फार्मर आयडी टाकल्यानंतर शेतीविषयक ई पीक पाहणी दरम्यान भरलेली संपूर्ण माहिती ओपन होईल त्यामुळे ई पीक पाहणी करणे अत्यंत आवश्यक आहे.
शेतकऱ्यांना शेतीविषयक योजनांचा लाभ घेत असताना फार्मर आयडीवर जर ई पीक पाहणी द्वारे पिकांची नोंदच झाली नसेल तर मात्र कोणत्याही योजनांचा लाभ शेतकरी घेऊ शकणार नाही, त्यामुळे अत्यंत महत्त्वाची बाब असून शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यासाठी सुविधा म्हणून सहाय्यकांची नियुक्ती करून त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची ई पिक पाहणी करून घेतली जाणार आहे. जे शेतकरी स्वतः मोबाईलच्या माध्यमातून ई पीक पाहणी करू शकतात ते स्वतः सुद्धा करू शकणार आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाची धन धान्य योजनेला मंजुरी, शेतकऱ्यांसाठी या योजने अंतर्गत 24 हजार कोटी