सोयाबिन पिवळे पडण्याची कारणे व उपाययोजना, कृषी सल्ला | Soyabin Pivale padnyavr Upay 

राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात सोयाबीन या पिकाची लागवड केली जाते, परंतु विविध भागांमध्ये आता सोयाबीनचे पीक पिवळे पडताना दिसते, आणि शेतकऱ्यांना सोयाबीनचे पीक पिवळे पडण्यामागचे नेमके कारण काय आहे? व कोणत्या प्रकारच्या उपाययोजना केल्यास पुन्हा सोयाबीन हिरवे पडेल असा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या माध्यमातून विचारला जाणारा प्रश्न आहे, त्यामुळे याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.

 

सोयाबीन पिवळे पडण्यामागे विविध प्रकारची कारणे आहेत व त्या विविध प्रकारच्या कारणांनुसार विविध प्रकारच्या उपाययोजना शेतकऱ्यांना कराव्या लागणार आहे.

 

कमी ओलावा असणे किंवा जास्त ओलावा असणे

सोयाबीन मध्ये खूप कमी ओलावा असल्यास कोरडेपणामुळे सोयाबीन पिवळी पडते व अति पाणी झाल्यास अति ओलावा असल्यास सुद्धा सोयाबीन पिवळे पडते त्यामुळे यामधील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ओलेपणा हटवण्यासाठी डवरणी करणे इतर प्रकारच्या उपायोजना शेतकरी करू शकतात व कोरडेपणा हटवण्यासाठी पाण्याची आवश्यकता सोयाबीनला लागू शकते.

 

खोडमाशीचा प्रादुर्भाव 

खोड माशीचा प्रादुर्भाव येण्यामागची कारणे म्हणजे शेतकऱ्यांनी बीज प्रक्रिया न करणे बीज प्रक्रिया केली नसल्यास खोड माशीचा प्रादुर्भाव जास्त आढळतो, व प्रादुर्भाव हटवण्यासाठी शेतकऱ्यांनी फवारणी मध्ये विद्राव्य खतांचा वापर करणे अत्यंत आवश्यक आहे. ट्रायकोबोस डी एस वापरावे.

 

तननाशकाचा वापर

तणनाशकाचा वापर केल्यानंतर त्या जमिनीमध्ये जर ओलावा नसेल म्हणजेच कोरड्या जमिनीमध्ये तननाशकाचा वापर झाल्यास सोयाबीन पिवळे पडण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे याला उपाय म्हणून शेतकऱ्यांनी सोयाबीनला 19-19 हे खत द्यावे.

 

येलो मोझॅक 

सोयाबीन पिकावर जर येलो मोझॅक चा अटॅक आलेला असेल, तर सोयाबीन मोठ्या प्रमाणात पिवळे पडून पानावर छोटे छोटे ठिपके दिसतात व यावर नियंत्रण मिळवायचे असेल तर सर्वप्रथम पांढऱ्या माशीवर नियंत्रण मिळवने अत्यंत गरजेचे असते त्यासाठी शेतकऱ्यांनी ओढाची अक्स्ट्रा वापरा.

 

चुनखडी जमीन/ पांढरी जमीन

चुनखडीच्या जमिनीमध्ये कॅल्शियमचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्याने झिंक व फेरस ए डी टी ए 20 gm द्यावें, यामुळे सोयाबीन हिरवे पडण्यास मदत होते अशा प्रकारे सोयाबीन पिवळे पडण्याची विविध कारणे व त्यावरील उपाय वरील प्रमाणे आहे.

 

शेतकरी बांधवांनो, ई पिक पाहणी ची अंतिम तारीख ठरली, ई पिक पाहणी न केल्यास कोणत्याही योजनेचा लाभ मिळणार नाही 

Leave a Comment

WhatsApp Icon