पी एम किसान योजना २० व्या हप्त्याचे 2000 रू या दिवशी होणार खात्यात जमा, तारीख फिक्स | PM Kisan Yojana 20th Installment

देशामध्ये पीएम किसान योजना राबवली जाते या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वार्षिक 12 हजार रुपयांचे मानधन दिले जाते, व याच योजनेचा 20वा हप्ता कधी जमा होणार? याची प्रतीक्षा प्रत्येक शेतकरी करत होते व अशाच शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी म्हणजे शासनाच्या माध्यमातून आता 2 ऑगस्ट 2025 रोजी पीएम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्याचे वितरण केले जाणार आहे.

 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून वाराणसी या ठिकाणी संबोधनाचा कार्यक्रम ठरवण्यात आलेला आहे व याच कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान यांच्या माध्यमातून, योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर 2 ऑगस्ट 2025 रोजी जवळपास 11 वाजता हप्त्याचे वितरण केले जाणार आहे.

 

देशातील एकूण 9.07 करोड शेतकऱ्यांना 20व्या हप्त्याचे वितरण केले जाईल, त्यामुळे पीएम किसान योजनेअंतर्गत देशातील सर्व पात्र असलेले लाभार्थ्यांच्या खात्यावर 2 ऑगस्टला हप्ता वितरण होईल व यानंतर नमो शेतकरी योजनेचा हप्ता या सर्व पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना वितरित केल्या जाईल परंतु नमो शेतकरी योजने संबंधित अपडेट अजून पर्यंत झालेले नाही, त्यामुळे पी एम किसान चा हप्ता 2 ऑगस्टला जमा होणार आहे.

 

पोकरा योजनेत तुमचे गाव आहे का? सर्व गावांची यादी एका मिनिटात मोबाईलवर बघण्याची संपूर्ण प्रोसेस 

Leave a Comment

WhatsApp Icon