राज्यामध्ये विविध प्रकारच्या योजनांचा लाभ मनरेगा अंतर्गत दिला जातो व कामगारांना एक ओळखपत्र म्हणून त्यांच्याकडे जॉब कार्ड उपलब्ध असते व अशाच राज्यातील जॉब कार्ड धारकांना आता केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे, त्यामुळे अनेक जॉब कार्डधारक नागरीकांना अजूनही केवायसी बद्दल माहिती नसल्याने त्यांनी जर केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही तर त्यांना कोणत्याही योजनांचा पुढील लाभ मिळू शकणार नाही.
Kyc कशी करावी?
जॉब कार्ड धारक नागरिकांना केवायसी प्रक्रिया करण्यासाठी एक ऑप्शन शासनाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेले आहे, स्वतःचा जॉब कार्ड क्रमांक त्याच पद्धतीने आधार कार्ड घेऊन ग्राम रोजगार सेवकाकडे जाऊन म्हणजे तुमच्या गावातील जो कोणी रोजगार सेवक असेल त्याच्याकडे केवायसी प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे त्यामुळे त्या ठिकाणी आधार कार्ड जॉब कार्ड नंबर या दोनच कागदपत्रावरून तुमचे फेस वेरिफिकेशन करून kyc प्रक्रिया पूर्ण केली जाईल.
केवायसी न केल्यास काय?
जॉब कार्ड धारक नागरिकांनी केवायसी केलेली नसेल अशा नागरिकांचे जॉब कार्ड बंद केले जाणार आहे, व त्यामुळेच भविष्यामध्ये मिळणारा कोणत्याही प्रकारचा लाभ जॉब कार्ड असून सुद्धा मिळू शकणार नाही, कारण ते जॉब कार्ड बंद केले जाईल.


