बांध कोरणाऱ्या शेतकऱ्यांना असा घाला आळा, शेत जमिनीचा बांध कोरल्यास कायदेशीर उपाय | Agriculture Law

तुम्ही जर शेतकरी असाल व तुम्हाला सुद्धा तुमच्या शेजारील शेतकऱ्यांकडून बांध कोरीचा त्रास चालू असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे, तुमच्या धूऱ्याची/बांधाची जागा इतर शेतकरी दडपण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यासोबत विवाद न करता तुम्हाला कायदेशीर पद्धतीने तुमची जमीन पुन्हा वापस मिळवता येते, बांध कोरीबाबत कोणते पावूल शेतकऱ्यांनी उचलायला हवे व ते कायदेशीर असायला हवे अशी संपूर्ण माहिती बघुयात

 

शेजारील शेतकरी धुरे किंवा बांध कोरतात, अशा ठिकाणी शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात भांडणे वादविवाद भेटतात परंतु या वाद विवादामुळे याचे मुळासकट कोणतेही उपाययोजना केली जात नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनो तुम्ही जर या बांधकोरीच्या त्रासापासून व्यापलेले असाल तर तुम्हाला कायदेशीर पद्धतीने तुमची जमीन पुन्हा वापस मिळवता येईल, यासाठी तहसील कार्यालय मधून शेतकऱ्याला सर्व बाबी करणे आवश्यक असते.

 

अतिक्रमण हटवण्यासाठी चे उपाय

 

शेतकऱ्यांना आपल्या शेतीवरील अतिक्रमण हटवण्यासाठी सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे मेजरमेंट मोजणी शेतकऱ्यांना करता येते, यासाठी शेतकऱ्यांना तहसील कार्यालयांमध्ये अर्ज करून त्या ठिकाणी शिफारस करावी लागते व त्यानंतर मेजरमेंट मोजणीच्या माध्यमातून शेतकऱ्याला शेतकऱ्याची एकूण एक गुंठाण गुंठा जमीन मोजून दिली जाते.

 

दुसरा पर्याय म्हणजे तुम्ही तहसील कार्यालयामध्ये आपल्या जमिनीवर अतिक्रमण होत आहे, याबाबत काही पुरावे साठवून डायरेक्ट तक्रार सुद्धा करू शकता, त्यामध्ये नंतर तहसील कार्यालयाच्या माध्यमातून सर्व चौकशी करून त्या ठिकाणी अतिक्रमण आढळल्यास अतिक्रमण हटवले जाईल. अशाप्रकारे शेतकरी आपल्या जमिनीवरील झालेल्या अतिक्रमणाला हटवू शकतात.

 

पोकरा योजनेमध्ये तुमचे गाव आहे का? लगेच यादी चेक करा, यादी चेक करण्याची संपूर्ण प्रोसेस मोबाईल द्वारे

Leave a Comment

WhatsApp Icon