राज्यामध्ये अन्नपूर्णा योजना राबवली जाते, या योजनेच्या माध्यमातून वार्षिक 3 सिलेंडर मोफत दिले जातात, या योजनेच्या माध्यमातून राज्यातील ज्या महिलांच्या नावे गॅस सिलेंडर आहे, त्याच पद्धतीने ज्या महिला लाडक्या बहिणी योजनेअंतर्गत पात्र आहेत व त्यांनी उज्वला गॅस योजनेचा लाभ घेतलेला आहे, अशा सर्व महिला अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून मोफत 3 गॅस सिलेंडर साठी पात्र आहेत, व या वर्षी सुद्धा 3 गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहे.
राज्यातील ज्या महिलांच्या नावे गॅस कनेक्शन आहे, व ज्या महिला लाडकी बहीण योजना व उज्वला गॅस योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या आहे, अशा सर्व महिलांना 2024-25 च्या आर्थिक वर्षांमध्ये 3 मोफत गॅस सिलेंडर देण्यात आलेले होते, व आताही सन 2025 च्या आर्थिक वर्षांमध्ये सुद्धा या सर्व महिलांना अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून तीन गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहे.
या महिन्यात येणार गॅस सिलेंडरची सबसिडी महिलांच्या खात्यात
सर्व अन्नपूर्णा योजनेअंतर्गत पात्र असलेल्या महिलांच्या खात्यामध्ये गॅस सिलेंडर ची सबसिडी ऑगस्ट-सप्टेंबर या महिन्यांमध्ये जमा केली जाणार आहे, व यासाठीच म्हणून सर्व विभाग अंतर्गत निधी वितरित करणे चालू झालेले आहे, उज्वला गॅस अंतर्गत असलेल्या लाभार्थ्यांना सबसिडी दिली जाते, अशा सर्व लाभार्थ्यांना गॅस सिलेंडरची रक्कम माफ केली जाते, वर्षातून 3 वेळा ही सबसिडी माफ करून उज्वला गॅस योजनेच्या लाभार्थ्यांना अन्नपूर्णा योजनेचा लाभ दिला जातो.
लाडक्या बहिणींचा हप्ता आला नसेल तर लगेच तक्रार करा, ऑनलाइन तक्रार प्रोसेस