अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात राज्यातील विविध भागांमध्ये नुकसान झालेले होते, त्यामुळे शासनाच्या माध्यमातून अनुदान मंजूर करण्यात आलेले होते परंतु यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या केवायसी च्या याद्या जाहीर झालेल्या होत्या व यामध्ये जून महिन्यापूर्वी मदत मंजूर झालेल्या व पात्र असलेल्या शेतकऱ्यांनी केवायसी केलेली होती, तर जून महिन्यानंतरही मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने शासनाच्या माध्यमातून अतिवृष्टीची मदत जाहीर करण्यात आलेली होती.
त्यामुळे या मदतीचे वितरण शासनाच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांचा फार्मर आयडी तयार झालेला आहे अशा शेतकऱ्यांना करण्यात आलेला आहे, त्याच पद्धतीने अतिवृष्टी अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरी झालेले आहे आणि शेतकऱ्यांना रब्बीचे अनुदान सुद्धा वितरित करण्यात आलेले आहे, परंतु यामध्ये या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढलेला नाही अशा शेतकऱ्यांना त्याच पद्धतीने सामायिक क्षेत्रामुळे शेतकऱ्यांना केवायसी प्रक्रिया करणे आवश्यक आहे.
ज्या शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदान व रब्बीचे अनुदान मिळालेले नसेल अशा शेतकऱ्यांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी kyc याद्यांमध्ये आपले नाव बघून kyc प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर शेतकऱ्यांना अतीवृष्टी अनुदानासह रब्बीचे अनुदान सुद्धा वितरित केली जाईल या संबंधित शेवटची तारीख 30 नोव्हेंबर ही देण्यात आलेली आहे या तारखेपर्यंत सर्व शेतकऱ्यांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी असे आवाहन कृषी विभागाच्या माध्यमातून केले जात आहे.
पोकरा योजनेत तुमचे गाव आहे का? सर्व गावांची यादी एका मिनिटात मोबाईलवर बघण्याची संपूर्ण प्रोसेस


