राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावर अतिवृष्टी चे अनुदान वितरीत करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे, 2024 मध्ये अतीवृष्टी, गारपीट, पूर परिस्थिती अशा प्रकारच्या विविध आपत्तीमुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते, व शेतकऱ्यांना याबाबत नुकसान भरपाई देणार असल्याचे सांगण्यात आलेले होते, व या संबंधित अनेक शेतकऱ्यांनी केवायसी प्रक्रिया सुद्धा पूर्ण केलेली होती, अशाच शेतकऱ्यांना आता अतीवृष्टीचे अनुदान वितरीत करण्यासाठी मान्यता दिलेली आहे.
2024 मधील नुकसान भरपाई मंजूर झाल्यानंतर याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या होत्या, त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी केवळ kyc प्रक्रिया सुद्धा जानेवारी ते एप्रिल महिन्या दरम्यान मोठ्या प्रमाणात केलेल्या होत्या व अशाच शेतकऱ्यांना एकूण 445 कोटी रुपयांची वितरण बाकी होते त्यापैकी 200 कोटी रुपयांचे वितरण शेतकऱ्यांच्या खात्यावर करण्यात आलेली होते, व उर्वरित असलेला 245 कोटी रुपयांचा निधी ज्या शेतकऱ्यांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे, अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणे बाकी असून आता हा 245 कोटी रुपयांचा निधी केवायसी केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित केला जाईल.
नुकसान भरपाई मध्ये जास्तीत जास्त यवतमाळ, बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा समावेश आहे इतर जिल्ह्यातील काही ठराविक शेतकरी यामध्ये पात्र आहेत, एप्रिल आणि मे महिन्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात शेती पिकाचे नुकसान झालेले होते व अशा झालेल्या नुकसान भरपाई चे प्रस्ताव पाठवण्यात आलेले आहे, त्यामुळे एप्रिल मे महिन्यामध्ये बाधीत झालेल्या क्षेत्रासाठी 213 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर केली जाणार आहे, यामध्ये मोठ्या प्रमाणात फळबागांची नुकसान झालेले होते, अशा प्रकारे आता शेतकऱ्यांना 2024 मधील अतिवृष्टीचे पैसे वितरित करण्यासाठी मान्यता दिलेली आहे.