आयुष्यमान कार्ड काढण्याची संपूर्ण प्रोसेस, आयुष्यमान कार्ड काढा मोबाईल वरून | Ayushyaman Card 

आयुष्यमान योजनेच्या माध्यमातून विविध प्रकारचे लाभ दवाखान्याची सुविधा देण्यात येते, व त्यामुळे त्यांचे आयुष्यमान कार्ड काढलेले नसेल अशा नागरिकांना आयुष्यमान कार्ड मोबाईलच्या माध्यमातून सुद्धा काढता येणार आहे, यामधील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजेच त्यांचे रेशन कार्ड ऑनलाइन झालेले आहेत कशा सर्व नागरिकांना आयुष्यमान कार्ड मोबाइल वरून काढता येईल.

 

30 जून पर्यंत ऑनलाईन रेशन कार्ड झालेल्या सर्व नागरिकांना आयुष्यमान ऑनलाईन पद्धतीने स्वतःच्या मोबाईल वरून काढता येणार आहे त्यामुळे संपूर्ण प्रोसेस जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात.

 

आयुष्यमान कार्ड काढण्याची संपूर्ण प्रोसेस

 

  • सर्वप्रथम प्ले स्टोअर वरून आयुष्यमान ॲप तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करा, ॲप ओपन करून त्या ठिकाणी लॉगिन चे ऑप्शन दिसेल, लॉगिन चे ऑप्शन निवडून त्या ठिकाणी बेनिफिशियली हे ऑप्शन निवडा.

 

  • त्यानंतर मोबाईल क्रमांक व कॅपच्या कोड जशास तसा इंटर करा, त्यानंतर मोबाईलवर आलेला ओटीपी टाकून कॅपच्या पुन्हा टाकून एन्टर करा.

 

  • त्यामुळे तुम्हाला स्कीम निवडावी लागेल पी एम जे ए वाय हे ऑप्शन निवडा. राज्य महाराष्ट्र निवडा, स्कीम मध्ये सर्वात शेवटी असलेले आयुष्यमान कार्डाचे ऑप्शन निवडा.

 

  • सर्च बाय हे ऑप्शन निवडून त्यामध्ये आधार कार्ड निवडून त्या ठिकाणी आधार कार्ड नंबर टाकावा लागेल, व तुमचा जो कोणता जिल्हा असेल ते जिल्हा निवडा, त्यानंतर पुन्हा कॅपच्या कोड टाकून सर्च बटन दाबा.

 

  • तुमच्या कुटुंबातील ज्या व्यक्तीचे आयुष्यमान काढलेले नसेल अशांची सर्व नावे दाखवली जाईल त्यामुळे त्यांचे आयुष्यमान कार्ड काढायचे असेल त्यामध्ये टू ऑप्शन निवडा. त्यानंतर आधार ओटीपी हा ऑप्शन निवडून वेरिफाय हे ऑप्शन निवडा.

 

  • मोबाईल नंबर वर आलेला ओटीपी इंटर करा त्यानंतर कॅप्चर फोटो हे ऑप्शन निवडा व त्याचे आयुष्यमान कार्ड काढत आहात त्याचा एक फोटो घ्या. तुमचे रिलेशन कुटुंबप्रमुखाशी काय आहे त्याचप्रमाणे मोबाईल नंबर आहे का अशी संपूर्ण माहिती भरा.

 

  • तुम्ही ग्रामीण भागातील आहात की शहरी भागातील हे निवडा, त्यानंतर सब डिस्टिक निवडा. ब्लॉग मध्ये गावाचे नाव निवडून सबमिट वर क्लिक करा.

 

  • आयुष्यमान कार्ड डाऊनलोड करण्यासाठी होम पेजवर येऊन त्या ठिकाणी डाऊनलोड करा हे ऑप्शन निवडून, तुम्हाला मोबाईल मध्ये आयुष्यमान कार्ड डाउनलोड करता येईल.

 

बांधकाम कामगारांना बायोमेट्रिक नोंदणी करावी लागणार, शासनाचा मोठा निर्णय 

Leave a Comment

WhatsApp Icon