बांधकाम कामगारांना पूर्वी सेफ्टी किट दिली जात होती त्यामध्ये काही वस्तूंचा समावेश होता परंतु आता नवीन निर्णय काढून जीआरच्या माध्यमातून इमारत व बांधकाम कामगार कल्याण विभागाचे माध्यमातून आता बांधकाम कामगारांना सेफ्टी किट मध्ये इतर काही वस्तूंचा समावेश करण्यात आलेला आहे, त्यामुळे त्या वस्तू कोणत्याही बांधकाम कामगारांना कशाप्रकारे त्या वस्तूंचा लाभ घेता येणार त्याच पद्धतीने याची संपूर्ण प्रोसेस व नवीन आलेल्या वस्तू सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात.
१८ जून 2025 रोजी निर्णय घेण्यात आलेल्या असून बांधकाम कामगारांना एक प्रकारे योग्य संरक्षण मिळावे यासाठी विविध प्रकारच्या वस्तूंचा समावेश करण्यात आलेला आहे, व या कीटचा लाभ महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याण विभागामध्ये नोंदणीकृत असलेली कामगार लाभ घेऊ शकणार आहेत. या सुधारित निर्णयानुसार बांधकाम कामगारांचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांना मोफत वस्तू देण्याबाबतचा हा निर्णय आहे.
बांधकाम कामगारांना सुरक्षा किट मध्ये 10 वस्तू
- 1) पत्र्याची पेटी
- 2) प्लास्टिकची चटई
- 3) चादर
- 4) बेडशीट
- 5) ब्लॅंकेट
- 6) 25 किलो धान्य साठवण पेटी
- 7) 22 किलो ची धान्य आठवण पेटी
- 8) साखर डब्बा
- 9) चहा पत्ती डब्बा
- 10) वॉटर प्युरिफायर 18 लिटर चा
अशाप्रकारे वरील दिलेल्या वस्तू या सुरक्षा किटमध्ये दिल्या जातील यासाठी तुम्हाला अर्ज सुद्धा संबंधित कार्यालयामध्ये करता येणार आहे.
Essential kit मधील 13 वस्तू
- 1. मास्क
- 2. सेफ्टी शूज
- 3. मच्छरदाणी
- 4. पाण्याची बाटली
- 5. सौर ऊर्जा टॉर्च
- 6. ट्रॅव्हल बॅग
- 7. इयर प्लब
- 8. सेफ्टी होर्नेस बेल्ट
- 9. हेल्मेट
- 10. जॅकेट रिफ्लेक्टिव्ह
- 11. सेफ्टी ग्लोज
- 12. गॉगल्स
- 13. टिफिन डब्बा स्टीलचा
अशा प्रकारच्या सर्व वस्तूंचा समावेश Essential kit मध्ये केला जाणार आहे, अशा प्रकारच्या संपूर्ण वस्तु बांधकाम कामगारांना दिल्या जाणार आहे.
राज्य शासनाची शेती AI धोरणाला मंजुरी, शासनाचे दोन मोठे निर्णय, शेतकऱ्यांना होणार फायदा
1 thought on “बांधकाम कामगारांना मिळणार सुरक्षा किट मध्ये 10 वस्तू व Essential kit मध्ये 13 वस्तू, शासन निर्णय आला | Bandhakam Kamgar Yojana ”