भांडी वाटप योजना संबंधी महत्त्वाची अपडेट आलेली आहे त्यामध्ये ज्या बांधकाम कामगारांनी आतापर्यंत भांडी वाटप योजनेचा लाभ घेतलेला नाही, अशा लाभार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करता येणार आहे, ज्या बांधकाम कामगारांची नोंदणी सक्रिय आहे कशा बांधकाम कामगारांना भांडी वाटप योजनेचा लाभ घेता येणार आहे, यामध्ये कशा पद्धतीने प्रोसेस पूर्ण करावी लागेल त्याच पद्धतीने ऑनलाईन मोबाईलच्या माध्यमातून भांडी वाटप योजनेचा लाभ मिळवण्यासाठी नोंदणी कशी करायची.
भांडी वाटप योजनेची नोंदणी करण्यासाठी सर्वप्रथम https://hikit.mahabocw.in/appointment अधिकृत संकेतस्थळ ओपन करावे पूर्वी ही सर्व प्रक्रिया नोंदणीची बांधकाम कामगाराला स्वतः करता येत नव्हती परंतु आता मात्र बांधकाम कामगारांना स्वतः सुद्धा ही प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे, त्यामुळे सर्वप्रथम त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर टाकावा लागेल रजिस्ट्रेशन मध्ये रजिस्ट्रेशन क्रमांक टाकून इतर सर्व माहिती त्या ठिकाणी ओपन होईल.
तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर माहिती नसल्यास https://iwbms.mahabocw.in/profile-login या ठिकाणी जाऊन तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर काढण्यासाठी आधार कार्ड नंबर व त्याचा कोड टाकून प्रोसेसर वर जाऊन रजिस्ट्रेशन नंबर ओपन होईल तो रजिस्ट्रेशन नंबर टाकावा व संपूर्ण माहिती ओपन झाल्यानंतर तुम्हाला स्लॉट निवडावे लागनार आहे.
स्लॉटची निवड कशी करावी?
संपूर्ण माहिती ओपन झाल्यानंतर तुमच्या गावाच्या शहराच्या आसपास असलेली ची नावे त्या ठिकाणी ओपन होतील त्यातील तुम्हाला जे नाव हवे असेल त्या ठिकाणचे कॅम्प तुम्ही निवडा त्यानंतर तुम्हाला अपॉइंटमेंट डेट निवडायची आहे त्यामध्ये रेड असलेले सर्व डेट या सरकारी सुट्ट्या असतील व येलो मध्ये असलेल्या सर्व डेट या बुक झालेल्या डेट्स असतील त्यामध्ये रिकाम्या असलेल्या डेट पैकी कोणतीही तारीख तुम्ही निवडू शकता.
त्यानंतर तुम्हाला घोषणापत्र त्या ठिकाणी उपलब्ध होईल त्याची प्रिंट काढून ते भरून तुम्हाला अपलोड करावे लागेल, त्याच पद्धतीने त्यानंतर तुम्हाला अपॉइंटमेंट लेटर प्रिंट काढून, तुम्ही निवडलेल्या तारखेला कॅम्प मध्ये कागदपत्रे घेऊन पोहोचायचे आहे व त्या ठिकाणी कागदपत्रे दाखवून तुम्हाला भांडी संच उपलब्ध होईल.
बांधकाम कामगार योजनेचे बोगस लाभार्थी शोध मोहीम सुरू, शासनाचा मोठा निर्णय, यांना नाही मिळणार लाभ