Aapla shetkari

बांधकाम कामगार भांडी वाटप योजना ऑनलाईन अर्ज सुरू, ऑनलाइन अर्ज करण्याची संपूर्ण प्रोसेस | Bhandi Vatap Sanch Arj 

Bhandi Vatap Sanch Arj, ऑनलाइन अर्ज करण्याची संपूर्ण प्रोसेस, भांडी वाटप 2025, भांडी वाटप योजना ऑनलाईन अर्ज सुरू, भांडी वाटप संच बांधकाम कामगार

राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात बांधकाम कामगार आहेत व बांधकाम कामगारांसाठी विविध प्रकारच्या योजना शासनाच्या माध्यमातून राबवल्या जातात, बांधकाम कामगारांना सेफ्टी कीट देणे, इसेन्शियल किट देणे, भांडे वाटप करणे अशा विविध प्रकारच्या योजना महाराष्ट्र राज्यांमध्ये चालू आहेत, व मागील काही दिवसांपूर्वी मोठ्या संख्येने नोंदणीकृत असलेल्या बांधकाम कामगारांना भांडी वाटप संचाचे वितरण करण्यात आलेले होते, परंतु त्यातूनही अनेक बांधकाम कामगार भांडी वाटप संचांपासून वंचित राहिलेले आहे, कशाचं कामगारांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी म्हणजेच भांडी वाटप संच मिळवण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया चालू झालेली आहे.

 

नोंदणी क्रमांक काढन्याची प्रोसेस

 

नोंदणी क्रमांक काढण्यासाठी सर्वप्रथम हे अधिकृत संकेतस्थळ https://iwbms.mahabocw.in/profile-login ओपन करा. त्यानंतर आधार कार्ड नंबर व मोबाईल क्रमांक टाकून प्रॉसिड हे ऑप्शन निवडा. त्यानंतर मोबाईल क्रमांकावर आलेला ओटीपी अपलोड करा. त्यानंतर तुमचा नोंदणी ची संपूर्ण माहिती ओपन होईल, त्या ठिकाणी तुमच्या नोंदणीची स्थिती अप्रूव असेल तरच तुम्हाला अर्ज करता येणार आहे.

 

ऑनलाइन अर्ज प्रक्रिया

 

भांडी वाटप संच साठी अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत संकेतस्थळ ओपन करावे,  त्यानंतर तुम्हाला वर्कर नोंदणी क्रमांक लागणार आहे. वरील दिलेल्या प्रोसेस नुसार नोंदणी क्रमांक काढा व एंटर करा, त्यानंतर तुमची संपूर्ण माहिती त्या ठिकाणी ओपन होईल, त्या ठिकाणी तुम्हाला शिबीर हे ऑप्शन दिसेल त्यामध्ये तुम्ही तुमच्या जवळपास असलेले कोणतेही एक शिबीर निवडा, त्यानंतर तुम्हाला अपॉइंटमेंट डेट निवडायची आहे, त्या डेट वर तुम्हाला त्या कार्यालयामध्ये जाऊन भांडी वाटप संच घ्यायचा आहे. नंतर तुम्हाला डिक्लेरेशन फॉर्म ची प्रिंट काढून त्या ठिकाणी तुमचे नाव व नोंदणी क्रमांक ऍड करून सही करून अपलोड करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला प्रिंट हे ऑप्शन दिसेल, त्या ठिकाणी तुम्ही प्रिंट काढून घेऊ शकता व हेच अपॉइंटमेंट लेटर घेऊन तुम्ही संबंधित तारखेला निवडलेल्या कार्यालयामध्ये जाऊन भांडीवाटप संच घेऊ शकता.

बांधकाम कामगारांना मिळणार वार्षिक 12 हजारांची पेन्शन, तुम्ही पात्र आहात का? बघा संपूर्ण माहिती शासन निर्णय

जिल्हा परिषद योजनांची अर्ज सुरु, शिलाई मशीन,फवारणी पंप, काटेरी कुंपण, पाईप लाईन तसेच विवीध बाबीचा लाभ

Leave a Comment

WhatsApp Icon