शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी शासनाच्या माध्यमातून काही निर्णय घेण्यात आलेले आहे, त्यामध्ये त्या सर्व बाबी शेतकऱ्यांना माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे, 2024 च्या हंगामामध्ये पूर्णपणे एक रुपयात पिक विमा योजना राबवली गेली, यावेळी मोठ्या प्रमाणात घोटाळे बघायला मिळाले व याच घोटाळ्यावरून यावर्षी सुधारित पिक विमा सुरू केलेली असून यामध्ये जर शेतकऱ्यांनी काही चुक केली तर शेतकऱ्यांवर कारवाई सुद्धा होऊ शकते, त्यामुळे ते कोणते काम आहे ज्यामुळे कारवाई होऊ शकणार आहे, अशी संपूर्ण माहिती आपण बघुयात.
एक रुपयात पिक विमा योजना राबवली जात असताना शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात चुकीच्या पद्धतीने पीक विमा उतरवला व त्याच पद्धतीने पिक विमा मध्ये घोटाळा आढळून आला व शासनाच्या माध्यमातून याची पडताळणी केल्या असता बोगस शेतकरी व त्यांची नावे पुढे आली व अशावेळी शासनाच्या माध्यमातून त्यांच्यावर कारवाई सुद्धा करण्यात आलेली होती, व अशा प्रकारचा घोटाळा पुन्हा पीक विमा योजनेमध्ये पहायला मिळू नये, यासाठी शासनाने यावर्षी एक रुपयात पीक विमा योजना बंद केलेली आहे.
2025 मध्ये सुधारित पिक विमा योजना राबवत असताना जर शेतकऱ्यांनी बोगस पिक विमा भरण्याचा प्रयत्न केला किंवा पिक विमा भरला व यांची नावे पुढे आली तर मात्र अशा शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल होईल, त्याच पद्धतीने त्या शेतकऱ्यांची नावे काळ्या यादीमध्ये टाकली जातील, म्हणजेच एकूण 5 वर्ष कोणत्याही योजनेचा लाभ त्या शेतकऱ्यांना घेता येणार नाही. अशा प्रकारची माहिती शासनाने दिलेली आहे, व त्यामुळे बोगस लाभार्थ्यांना या निर्णयामुळे आळा बसू शकणार आहे.