शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी शासनाच्या माध्यमातून नवीन माहिती ई पिक पाहणी बाबत देण्यात आलेली आहे, अनेक शेतकऱ्यांना प्रश्न होते की एक रुपयात पीक विमा योजना बंद झाल्यानंतर शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करावी लागणार की नाही? व याबाबतच ई पीक पाहणी कशी करावी त्याच पद्धतीने कोणत्या प्रकारच्या सुविधा शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी देण्यात आलेल्या आहे अशा प्रकारचे संपूर्ण माहिती खालील प्रमाणे जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात.

 

शासनाच्या माध्यमातून 27 जून 2025 रोजी देण्यात आलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांना 2025 मध्ये आता खरीप हंगामासाठी ई पीक पाहणी करावी लागणार आहे, ही ई पिक पाहणी DCS या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून केली जाणार आहे, परंतु यामध्ये एक मोठा प्रश्न म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याकडे मोबाईल नसणे व असला तरी ई पिक पाहणी कशी करावी? याबद्दलची माहिती नसणे या अशा अनेक कारणांमुळे सर्व शेतकरी ई पीक पाहणी करू शकत नाही, काही शेतकरी ई पिक पाहणी करतात परंतु ज्या शेतकऱ्यांना याबद्दल कोणत्याही प्रकारची माहिती नसते अशे शेतकरी पिक पाहणी पासून वंचित असतात त्यामुळे शासनाच्या माध्यमातून अशा शेतकऱ्यांसाठी एक सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.

 

शेतकऱ्यांची पिक पाहणी करण्यासाठी तलाठ्यासोबत एक सहायक नेमवले जातात, व त्यांच्या माध्यमातून गावातील जे क्षेत्र ई पिक पाहणी पासून वंचित आहे अशा क्षेत्राची पिक पाहणी केली जाते, व त्या सहायकांना प्रति प्लॉट 10 रुपये एवढे मानधन करण्यात येणार आहे, त्यामुळे आता ज्या शेतकऱ्यांना स्वतः आपल्या मोबाईलच्या माध्यमातून ई पिक पाहणी करणे शक्य नाही अशा शेतकरी सहजरित्या सहाय्यकाच्या माध्यमातून ई पिक पाहणी करून घेऊ शकतात त्यामुळे अशा प्रकारचे हे महत्त्वाची बाब शासनाच्या माध्यमातून सांगण्यात आलेली आहे, त्यामुळे आता 100% शेतीवरील येथील पाहण्याची नोंद करता येणे शक्य होणार आहे. अशाप्रकारे शासनाच्या माध्यमातून जीआर काढण्यात आलेला आहे.

 

FARMER ID शोधा फक्त 2 मिनिटात, मोबाइल द्वारे, संपुर्ण योजनांचा लाभ मिळवण्यास farmer ID आवश्यक

Leave a Comment

WhatsApp Icon