देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी वार्षिक मानधन म्हणून पीएम किसान योजनेची सुरुवात करण्यात आली, आतापर्यंत पीएम किसान योजनेच्या माध्यमातून एकूण 19 हप्त्याचे वितरण शेतकऱ्यांच्या खात्यावर करण्यात आलेले आहे, त्यामुळे पुढील हप्ता कधी येणार याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना लागलेली आहे, तर अनेक ठिकाणी खोट्या बातम्या सांगून पीएम किसान चा हप्ता या दिवशी येणार किंवा तारीख ठरली अशा प्रकारच्या माहितीने शेतकऱ्यांना भांडवले जात आहे, परंतु आतापर्यंत पीएम किसान योजनेची कोणत्याही प्रकारची विसाव्या हप्त्याची तारीख ठरवण्यात आलेली नाही. प्रत्येक हप्ता वितरण करताना शासनाच्या माध्यमातून पूर्व सूचना दिल्या जातात व एखादा कार्यक्रम ठरवून हप्त्याचे वितरण केले जाते.
शेतकऱ्यांनो पीएम किसान योजनेअंतर्गत तुम्ही अटींमध्ये पात्र असून सुद्धा तुम्हाला जर पीएम किसानचा हप्ता येत नसेल तर तुम्हाला आपल्या शेती संबंधित आवश्यक माहिती त्याच पद्धतीने ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे, कारण देशातील मोठ्या प्रमाणात शेतकरी पीएम किसान योजनेच्या माध्यमातून वार्षिक 12 हजार रुपये मानधनाचा लाभ घेत आहे, व तुम्ही जर या योजनेसाठी पात्र असाल परंतु तुम्हाला योजनेचा लाभ मिळत नसेल तर तुम्ही सुद्धा योजनेचा लाभ केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घेऊ शकता.
केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे, पीएम किसान च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन त्या ठिकाणी केवायसी प्रक्रियेची ऑप्शन दिसेल, केवायसी प्रक्रियेची ऑप्शन ओपन केल्यानंतर त्या ठिकाणी मोबाईल क्रमांक, आधार कार्ड तसेच विचारलेली संपूर्ण माहिती भरून ओटीपी टाकून अशा प्रकारे सर्व सबमिट करून केवायसी प्रक्रिया अत्यंत सहजरीत्या शेतकऱ्यांना पूर्ण करता येणार आहे, त्यामुळे ही सर्व प्रक्रिया केल्यानंतर अर्थातच तुम्ही जर योजनेसाठी पात्र ठरत असाल तर तुम्हाला सुद्धा पुढील 20 वा हप्ता मिळू शकतो.