महाडीबीटी फार्मर स्कीम पोर्टलच्या माध्यमातून विविध प्रकारच्या योजना शेतकऱ्यांसाठी राबवल्या जात असतात, यातीलच एक महत्त्वाची योजना म्हणजेच फळबागेसाठी मिळणारे अनुदान, विविध प्रकारच्या फळ पिकांसाठी महाडीबीटी फार्मर स्कीम च्या माध्यमातून अनुदान दिले जाते, व यासंबंधीत अर्ज प्रक्रिया चालू झालेली असून अर्ज कशा पद्धतीने करायचा? व कशा पद्धतीने शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल याची संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.
महाडीबीटी पोर्टल फळ बाग अनुदान अर्ज प्रोसेस
- शेतकऱ्यांना अर्ज करायचा असल्यास सर्वप्रथम महाडीबीटी पोर्टलच्या अधिकृत संकेतस्थळ ओपन करावे. त्या ठिकाणी शेतकऱ्याला लॉगिन करा हे ऑप्शन दिसेल लॉगिन करतात असताना शेतकऱ्यांना फार्मर आयडी एंटर करून लॉगिन करून घ्यायचे आहे.
- ओटीपी पाठवून लॉगिन करून घेऊन प्रोफाइल पूर्ण करा, हे ऑप्शन तुम्हाला निवडायचे आहे, व विचारलेली माहिती भरून 100% प्रोफाइल पूर्ण होईल व माहिती जतन करा हे ऑप्शन निवडून पुढे जा.
- घटकासाठी अर्ज करा हे ऑप्शन निवडून फलोत्पादन हे ऑप्शन निवडायचे आहे, त्यामध्ये तुम्हाला दिसेल भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना हे ऑप्शन निवडून पुढे जा.
- संपूर्ण माहिती विचारली जाईल त्यामध्ये गट नंबर निवडावा त्यानंतर तुम्हाला घटक निवडायचा आहे त्यामध्ये इतर घटक हे ऑप्शन निवडा, त्यानंतर बाग लागवड हे ऑप्शन निवडून, फळ पिके ऑप्शन निवडा.
- तुम्ही कोणते फळ पीक घेणार आहात ते ऑप्शन मध्ये योग्य प्रकारे निवडून घ्या, व तुम्ही निवडलेले पिकामधील अंतर निवडून घ्या, फळबाग लागवडीसाठी क्षेत्र निवडा.
- त्यानंतर जतन करा हे ऑप्शन निवडून पुढे मुख्यपृष्ठावर आल्यानंतर अर्ज सादर करा हे ऑप्शन दिसेल अर्ज सादर करा हे ऑप्शन निवडून त्या ठिकाणी पेमेंट करा हे ऑप्शन निवडा व 23 रुपये 60 पैशाचे पेमेंट करून अर्ज सबमिट होईल, अशाप्रकारे अर्ज शेतकऱ्यांना मिळवता येणार आहे.
पोकरा योजनेत तुमचे गाव आहे का? सर्व गावांची यादी एका मिनिटात मोबाईलवर बघण्याची संपूर्ण प्रोसेस