शेतकऱ्यांनो आता शेतमालाची ऑनलाइन विक्री करता येणार, ऑनलाईन शेतमाल विक्रीसाठी फॉर्म गेट मॉडेल लागू होणार | Farm Get Model

राज्यामध्ये विविध प्रकारची शेती पिके शेतकऱ्यांच्या माध्यमातून घेतली जातात, परंतु योग्य वेळेला योग्य दराने शेतकरी आपल्या मालाची विक्री करू शकत नाही, त्यामुळे शासनाच्या माध्यमातून एक नवीन पाऊल उचलण्यात यावे यासाठी पणन विभागाअंतर्गत पणन मंत्री जयकुमार रावल यांनी मध्यप्रदेश सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये सुद्धा शेतकऱ्यांच्या सुविधेला हातभार लावण्यासाठी फार्म गेट मॉडल ला मान्यता द्यावी अशी मागणी केलेली आहे, त्यामुळे फार्म गेट मॉडेलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कोणत्या सुविधा प्राप्त होणार त्याच पद्धतीने फार्म गेट मॉडेल म्हणजे काय? अशी संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.

 

फार्म गेट मॉडेलच्या माध्यमातून शेती पिकाची बोली थेट व्यापारी लावू शकता, त्यासाठी कोणत्याही ठिकाणी जाण्याची गरज नसते ऑनलाईन पद्धतीने सर्व प्रक्रिया उपलब्ध असतात व शेतकऱ्याला स्वतः आपल्या मालाची विक्री करता येते व यामध्ये कापूस, मका, गहू, टोमॅटो अशा प्रकारच्या पिकांचा समावेश असेल, अशा प्रकारच्या सुविधा शेतकऱ्यांना प्राप्त व्हाव्या यासाठी मागणी केली जात आहे.

 

फार्म गेट मॉडेलची सुविधा शेतकऱ्यांना प्राप्त झाल्यास मोठ्या प्रमाणात फायदा शेतकऱ्यांचा होऊ शकतो, कारण शेतीमधून बाजारात नेऊन शेतीमालाची विक्री करेपर्यंत लागणारा खर्च शेतकऱ्यांचा वाचू शकतो त्याच पद्धतीने व्यापाऱ्यांकडून होणारी फसवणूक यापासून शेतकऱ्याचा बचाव होऊ शकतो, त्याच पद्धतीने सर्व शेतीमाल शेतकऱ्यांना एकाच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध सुद्धा होऊ शकतात. अशाप्रकारे शेतकऱ्यांना फार्म गेट मॉडेलच्या माध्यमातून विविध प्रकारच्या सुविधा घरबसल्या मिळतील.

 

पोकरा योजनेमध्ये तुमचे गाव आहे का? लगेच यादी चेक करा, यादी चेक करण्याची संपूर्ण प्रोसेस मोबाईल द्वारे 

Leave a Comment

WhatsApp Icon