शासनाच्या माध्यमातून विविध प्रकारच्या सुविधा शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिल्या जात आहे, व शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती शेती संबंधित त्याच पद्धतीने सर्व माहिती एका ठिकाणी उपलब्ध होण्यासाठी शासनाच्या माध्यमातून फार्मर आयडी शेतकऱ्यांचा काढून घ्यावा, याबद्दल चे आवाहन करण्यात आलेले आहे, फार्मर आयडी आतापर्यंत मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी काढलेला आहे, परंतु तरीसुद्धा काही शेतकरी या फार्मर आयडी पासून वंचित आहे त्यामुळे त्यांनी सुद्धा फार्मर आयडी काढून घेणे गरजेचे आहे.
आता कोणत्याही ठिकाणी लॉगिन किंवा योजनेचा अर्ज करताना सुद्धा शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती फक्त एका फार्मर आयडीवर उपलब्ध होऊ शकते, त्यामुळे आता फार्मर आयडी हे एक प्रकारचे ओळखपत्र शेतकऱ्यांचे होऊ शकते, त्यामुळे तुम्ही जर शेतकरी असाल तर फार्मर आयडी काढून घेणे अत्यंत आवश्यक आहे, कारण शासनाच्या माध्यमातून या संबंधित सर्व सूचना देण्यात आलेल्या आहे, आणि ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढून घेतलेला आहे अशा फार्मर आयडी काढून घेतलेल्या एकूण शेतकऱ्यांची संख्या 358674 एवढी आहे.
तुम्हाला जर फार्मर आयडी बद्दल काहीही माहिती नसेल तर जवळच्या सेतू सुविधा केंद्र मध्ये जाऊन त्या ठिकाणी तुम्ही आपली कागदपत्रे त्यामध्ये आधार कार्ड, सातबारा व मोबाईल क्रमांक अशा प्रकारच्या या कागदपत्रावरून शेतकरी सहजरित्या फार्मर आयडी काढू शकतो, व येत्या पुढील काळामध्ये जर शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढला नाही, तर शेतकऱ्यांना कोणत्याच प्रकारच्या योजनांचा लाभ सुद्धा दिला जाणार नाही, त्यामुळे ही एक महत्त्वाची बाब शासनाच्या माध्यमातून सांगितली जात आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी याची दक्षता घ्यावी.
पीएम किसान चा तुमचा हप्ता येणार की नाही? ऑनलाइन चेक करा, बघा संपूर्ण प्रोसेस