शासनाच्या माध्यमातून एक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे, केंद्र शासनाच्या माध्यमातून व राज्य शासनाच्या माध्यमातून विविध प्रकारच्या योजना शेतकऱ्यांसाठी राबवल्या जातात, व या सर्व योजना महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्या गेलेल्या आहेत, व महाडीबीटी पोर्टलवर ज्या शेतकऱ्यांची निवड झाली, अशा शेतकऱ्यांना कागदपत्रे अपलोड करावी लागते, व याच कागदपत्रा संबंधित एक महत्त्वाची बातमी शासनाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेली आहे.
शासनाने दिलेल्या माहितीनुसार ज्या शेतकऱ्यांची निवड विविध योजनांसाठी महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून होईल अशा शेतकऱ्यांना आता सातबारा व आठ अ ही कागदपत्रे अपलोड करण्याची काहीही गरज नाही, कारण आता प्रत्येक शेतकऱ्याकडे फार्मर आयडी असल्याने फार्मर आयडीलाच शेतकऱ्यांची शेती विषयक संपूर्ण माहिती जुळलेली आहे, त्यामुळे फार्मर आयडी टाकल्याबरोबरच सर्व माहिती ओपन होते, शेतकऱ्यांना आठ अ व सातबारा कोणत्याही योजनेसाठी मागू नये अशा प्रकारच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.
त्यामुळे महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून जेवढे शेतकरी इथून पुढे योजनेसाठी पात्र ठरतील अशा शेतकऱ्यांना आता सातबारा व आठ अ अपलोड करावा लागणार नाही, अशा प्रकारची अत्यंत महत्त्वाची बातमी शासनाने दिलेली आहे, ज्या शेतकऱ्यांनी आता फार्मर आयडी काढलेला नाही अशांनी फार्मर आयडी काढून घ्यावा, कारण आता प्रत्येक योजनेचा लाभ घेत असताना फार्मर आयडीलाच प्रथम ठेवून योजनेअंतर्गत पात्र ठरवले जाईल त्यामुळे शेतकऱ्याकडे योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर फार्मर आयडी असणे आवश्यक आहे, कारण शेतकऱ्याचा संपूर्ण शेती विषयक डाटा फार्मर आयडीला जोडला जातो.